‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टू-व्हीलर ब्रॅन्ड्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. (Top-Selling Two-Wheeler Brands In India In January 2021)

'या' आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 12:13 PM

मुंबई : भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टू-व्हीलर ब्रॅन्ड्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) हा देशातील सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड ठरला आहे, तर होंडा (Honda) आणि टीव्हीएस (TVS) अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत. हीरो मोटोकॉर्प कंपनी भारतातील दुचाकींच्या बाजारावर वर्चस्व गाजवत आहे. हिरो मोटोकॉर्प कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 4.67 लाख दुचाकींच्या विक्रीची नोंद केली आहे. (Top-Selling Two-Wheeler Brands In India In January 2021, Hero MotoCorp Continues To Remain Top-Ranked)

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हिरोने केलेल्या विक्रीच्या तुलनेत यंदा 4.2 टक्क्यांनी घट झाली आहे, कंपनीने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात 4.88 लाख दुचाकी वाहनांची विक्री केली होती. विक्रीत 4.2 टक्क्यांची घट झाली असली तरीदेखील जानेवारी महिन्यात सर्वाधिक दुचाकी विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत हिरो मोटोकॉर्प पहिल्या स्थानावर आहे.

टू व्हीलर्सच्या विक्रीच्या बाबतीत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडिया (HMSI) ही कंपनी देशात दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत होंडाच्या विक्रीत यंदा 11.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तरीदेखील कंपनी दुसर्‍या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 4.16 लाख वाहनांची विक्री नोंदविली आहे, तर जानेवारी 2020 मध्ये होंडाने 3.74 लाख दुचाकी वाहनांची विक्री केली होती.

हिरो आणि होंडानंतर टीव्हीएस कंपनी तिसऱ्या स्थानावर आहे. टीव्हीएस या दुचाकी वाहन उत्पादक कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 2.05 लाख युनिट वाहनांची विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात केलेल्या विक्रीच्या तुलनेत कंपनीने यंदा 26 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 2020 मध्ये जानेवारी महिन्यात टीव्हीएसने 1.63 लाख वाहनांची विक्री केली होती.

बजाज ऑटो चौथ्या स्थानी

दुचाकी विक्रीच्या बाबतीत बजाज ऑटो ही कंपनी देशात चौथ्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2021 मध्ये बजाज ऑटोने 1.57 लाख युनिट्स दुचाकींची विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बजाजने जवळपास इतक्याच वाहनांची विक्री केली होती.

रॉयल एनफील्ड पाचव्या स्थानी

एकूण विक्रीच्या बाबतीत चेन्नईस्थित दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफील्ड पाचव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 64,372 युनिट्सची विक्री केली आहे. जानेवारी 2020 मध्ये रॉयल एनफिल्डने 61,292 दुचाकी वाहनांची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत RE च्या विक्रीत यंदा 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सुझुकी सहाव्या तर यामाहा सातव्या नंबरवर

दुचाकी विक्रीच्या बाबतीत सुझुकी कंपनी देशात सहाव्या क्रमांकावर आहे, तर यामाहा सातव्या, Piaggio आठव्या, कावासाकी 9 व्या आणि ट्रायम्फ दहाव्या क्रमांकावर आहे. डिसेंबर 2020 मध्ये याच कंपन्या टॉप 10 मध्ये होत्या. क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसला तरी जवळपास सर्वच कंपन्यांच्या विक्रीत जानेवारी 2021 मध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा

TVS कडून शेजारील देशात Ntorq 125 SuperSquad मार्वल एडिशन स्कूटर लाँच; जाणून घ्या खासियत

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

(Top-Selling Two-Wheeler Brands In India In January 2021, Hero MotoCorp Continues To Remain Top-Ranked)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.