टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेल व्हेरियंटची बुकिंग बंद… काय आहे नेमकं कारण?
टोयोटाने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय क्रिस्टा डिझेल व्हेरिएंटची बुकिंग अचानक बंद केली आहे. याबाबत टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने सांगितले, की जास्त मागणीमुळे, कंपनीने बुकिंग तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. आधीच बुकिंग करुन ठेवण्यात आलेल्या गाड्यांची वेटिंग लिस्ट जास्त असल्याने त्यांची पूर्तता करणे अवघडत होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे प्रलंबित गाड्यांची आकडेवारी कमी करुन पुढील बुकिंग घेण्यात येणार असल्याचे समजते.
मुंबईः टोयोटाने (Toyota) त्यांच्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या MPV कार इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) डिझेल व्हेरिएंटची बुकिंग तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टोयोटाने या निर्णयामागे खास कारणही सांगितले आहे. कंपनीने नुकतीच अधिकृत माहिती दिली असली, तरी कंपनी असा निर्णय घेण्याच्या विचारात आहे, हे आधीच उघड झाले होते. आपला निर्णय अधिकृतरित्या जाहीर करताना, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने सांगितले की, जास्त मागणीमुळे, कंपनीने बुकिंग तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल व्हेरियंटचे (petrol variant) बुकिंग सुरू झाली असून सर्वात पहिले बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना पहिले प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
टोयोटाने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय क्रिस्टा डिझेल व्हेरिएंटची बुकिंग अचानक बंद केली आहे. याबाबत टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने सांगितले, की जास्त मागणीमुळे, कंपनीने बुकिंग तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. आधीच बुकिंग करुन ठेवण्यात आलेल्या गाड्यांची वेटिंग लिस्ट जास्त असल्याने त्यांची पूर्तता करणे अवघडत होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे प्रलंबित गाड्यांची आकडेवारी कमी करुन पुढील बुकिंग घेण्यात येणार असल्याचे समजते.
इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे फीचर्स
टोयोटा आपल्या इनोव्हा क्रिस्टामध्ये 150hp 2.4 लिटर इंजिन देत आहे. त्यात, पाच स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश आहे. पेट्रोल व्हर्जनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 2.7 लीटर इंजिन असून ते 166hp पॉवर जनरेट करते. 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक देण्यात आले आहे.
इनोव्हा हायक्रॉसची एंट्री
रिपोर्टनुसार, कंपनी आपली नवीन इनोव्हा हायक्रॉस लॉन्च करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या माध्यमातून कंपनी हायक्रॉसचे ग्लोबली डेब्यु करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऑटोकार वेबसाइटनुसार, हे इनोव्हा क्रिस्टलचे अडिशनल मॉडेल असेल. ही नवीन MPV पेट्रोल-हायब्रिड इंजिन पर्यायासह लॉन्च केली जाऊ शकते. टोयोटा प्रमाणेच Hyrider देखील लॉन्च करणार आहे. Hyrider चे डिझेल व्हेरियंट देखील अपेक्षित आहे.