एकही रुपया न देता Toyota ची ढासू SUV घरी न्या, 5 महिन्यांनी पैसे भरा
विविध वाहन कंपन्या त्यांच्या गाड्यांवर वेगवेगळ्या आणि उत्तम ऑफर देत आहेत. दरम्यान, टोयोटा (Toyota) कंपनीने एक उत्कृष्ट ऑफर सादर केली आहे,
मुंबई : कोरोना साथीच्या या कालावधीत देशभरात एप्रिल आणि मेमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला, ज्यामुळे वाहन कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत, आता बऱ्याच कार कंपन्या गेल्या महिन्यात झालेलं नुकसान जूनमध्ये भरून काढण्याच्या योजना आखत आहेत. म्हणूनच विविध कंपन्या वेगवेगळ्या आणि उत्तम ऑफर देत आहेत. दरम्यान, टोयोटा (Toyota) कंपनीने एक उत्कृष्ट ऑफर सादर केली आहे, ज्यामध्ये आपण कंपनीची सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही टोयोटा अर्बन क्रूझर (Toyota Urban Cruiser) पैसे न देता घरी आणू शकता. (Toyota giving Buy now and pay later offer on Urban Cruiser compact SUV)
“Buy Now and Pay Later” असं या ऑफरचं नाव आहे. म्हणजेच आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या. जरी कंपनीने अद्याप याबद्दल अधिक माहिती शेअर केलेली नाही, परंतु ही ऑफर फेसबुकसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह झाली आहे. Cartoq च्या वृत्तानुसार, टोयोटा ग्राहकांना आत्ता ही कार घरी नेण्याची संधी देईल आणि ऑक्टोबर 2021 पासून त्याचे पेमेंट देता येईल. याचा अर्थ असा की, या ऑफर अंतर्गत ग्राहक ऑक्टोबरपर्यंत अर्बन क्रूझर एसयूव्हीचा (Urban Cruiser SUV) आनंद घेऊ शकतात आणि चार महिन्यांत पैसे जमा करून पेमेंट करु शकतात. मात्र याखेरीज या ऑफरबद्दल अन्य कोणतीही माहिती समोर आली नाही.
अशा परिस्थितीत, जो ग्राहक लोनवर कार खरेदी करेल त्याला कर्जाचा हप्ता शेवटी भरावा लागेल. या प्रकारची ऑफर काही वर्षांपूर्वी भारतात स्कोडाने सादर केली होती. टोयोटा प्रथमच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशी ऑफर देत आहे.
इंजिन
कंपनीने ही एसयूव्ही गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतीय बाजारात सादर होती. ही एसयूव्ही मारुती सुझुकीच्या लोकप्रिय सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही विटारा ब्रेझावर आधारित आहे. यात 1.5 लीटर 4 सिलेंडर नॅचरली अॅस्पीरेटेड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे, जे 105bhp पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कनव्हर्टर गियरबॉक्ससह सुसज्ज आहे. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये हायब्रिड तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
दमदार मायलेज
या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, या कारचं मॅन्युअल व्हर्जन 17.03 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 18.76 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. ही एसयूव्ही भारतीय बाजारपेठेमध्ये तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये मिड, हाय आणि प्रीमियमचा समावेश आहे. अर्बन क्रूझर एसयूव्ही, एंट्री-लेवल व्हेरिएंट मिड-ग्रेड एमटीची किंमत 8.40 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 11.50 लाख रुपये इतकी आहे.
इतर बातम्या
ठरलं! ‘या’ दिवशी लाँच होणार बहुप्रतीक्षित Hyundai Alcazar, लाँचिंगआधी जाणून घ्या SUV चे फीचर्स
दमदार फीचर्ससह 2021 Skoda Octavia भारतात दाखल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(Toyota giving Buy now and pay later offer on Urban Cruiser compact SUV)