Toyota Hyryder Car भारतात लाँच आज होणार… ‘या’ खास गोष्टी जाणून घ्या…
या अपकमिंग कारमध्ये 1.5 लीटरचा माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन मारुतीसह मिळून तयार करण्यात आले आहे. या इंजिनच्या माध्यमातून 103 एचपीची पॉवर जनरेट होते. या शिवाय यात 6 स्पीड एमटी आणि 6 स्पीड एटीची पॉवरदेखील उपलब्ध होते.
मुंबई : टोयोटा (Toyota) इंडिया आज भारतात आपली न्यू एसयुव्ही (NEW SUV) कार लाँच करणार आहे. या एसयुव्ही कारचे नाव Toyota Hyryder असणार आहे. यात हायब्रिड इंजिन बघायला मिळणार असून यामुळे ही कार चांगला मायलेज देईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या कारची स्पर्धा होंडाच्या हायब्रिड कार होंडा सिटी ई एचईव्ही इलेक्ट्रिकशी होणार आहे. हायब्रिड इंजिनमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक मोटर्स असे कॉम्बिनेशन तयार केले जाते की ज्याच्या माध्यमातून कार एक चांगला परफोर्मंस आणि मायलेज (Mileage) तयार करु शकते. Toyota Hyryder कारच्या सुरवातीची किंमत 12 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या दोन्हीही एक्सशोरुम किंमती आहे. बॉडी टाइपला घेउन या एसयुव्ही कारची स्पर्धा मिड रेंज सेगमेंटच्या किआ सेल्टॉसशी होउ शकते. या शिवाय या सेगमेंटमध्ये ह्युंडाई क्रेटा, फॉक्सवेगन टाइगुन आणि महिंद्रा स्कोर्पियो एन या कारसोबतही स्पर्धा होउ शकते.
लुक्स आणि डिझाईन
टोयोटाच्या या लेटेस्ट हायब्रिड कारचा लुक लेक्स मॉडेलशी काही प्रमाणात मिळताजुळता आहे. कारच्या फ्रंट फेसचा विचार केल्यास यात बरेच साधर्म्य आढळते आहे. कारची हलकीशी झलक दिसून येत असलेल्या व्हिडिओमध्येही या दोन्ही कारच्या डिझाईनमध्ये बरेच सारखे दुवे दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे नुकतीच लाँच करण्यात आलेल्या टोयोटा ग्लेंजाशी देखील काही प्रमाणात लूक समान दिसून येत आहे. या कारमध्ये एक थिन क्रोमचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात लोअर पोजिशनवर एलईडी हेडलँप लावण्यात आले आहेत.
काय आहेत फीचर्स
कंपनीकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या टीझर व्हिडिओनुसार, टोयोटा अर्बन Cruiser Hyryder मध्ये एक स्पेशिअर केबिन देखील मिळणार आहे. सोबत यात एक लार्ज टच स्क्रीन देण्यात आले आहे. यात इंफोटेनमेंट सिस्टम दिली आहे. समोरच्या बाजूला पॉवर सीट सिस्टीम असेल. यात 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा पार्किंगसाठी चांगली मदत करेल. तसेच यात ऑटोमेटीक क्लाईमेट कंट्रोल्स देण्यात आले असून सोबत इलेक्ट्रिक सनरुफही देण्यात आले आहे.
स्पेसिफिकेशन्स
या अपकमिंग कारमध्ये 1.5 लीटरचा माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन मारुतीसह मिळून तयार करण्यात आले आहे. या इंजिनच्या माध्यमातून 103 एचपीची पॉवर जनरेट होते. या शिवाय यात 6 स्पीड एमटी आणि 6 स्पीड एटीची पॉवरदेखील उपलब्ध होते.
काय असते हायब्रिड इंजिन
हायब्रिड इंजिन एक नव्हे तर दोन प्रकारच्या पॉवरवर चालत असतात. यात, एक पेट्रोल आणि दुसर्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आली असून ती इंजिनला पॉवर देण्याचे काम करीत असते. या पध्दतीने काही अंतर पेट्रोलच्या मदतीने व उर्वरीत अंतर बॅटरीच्या मदतीने पार केले जाउ शकते.