सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज, Toyota ची Electric Car लाँच होणार

टोयोटा (Toyota) आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या ऑटो कंपन्या सध्या मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर (Mid Size Electric SUV) काम करत आहेत. 27PL या नावाने ओळखल्या जाणार्‍या स्केटबोर्ड आर्किटेक्चरसह या 5 सीटर कार असतील आणि ते टोयोटाच्या 40PL वरून घेतल्या जातील.

सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज, Toyota ची Electric Car लाँच होणार
Toyota car (प्रातिनिधिक फोटो)Image Credit source: File
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 5:53 PM

मुंबई : टोयोटा (Toyota) आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या ऑटो कंपन्या सध्या मध्यम आकाराच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीवर (Mid Size Electric SUV) काम करत आहेत. 27PL या नावाने ओळखल्या जाणार्‍या स्केटबोर्ड आर्किटेक्चरसह या 5 सीटर कार असतील आणि ते टोयोटाच्या 40PL वरून घेतल्या जातील. हाय लोकल कंटेंट आणि बॅटरी सोर्सिंगसह ई-SUV ची किंमत 13-15 लाख रुपयांच्या रेंजमध्ये (एक्स-शोरूम) असेल अशी अपेक्षा आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, या कारची अंदाजे लांबी 4.3 मीटर असेल, रुंदी 1.8 मीटर असेल आणि ती 1.6 मीटर उंचीसह 2.7 मीटर लांबीच्या व्हीलबेससह येऊ शकते. टोयोटाच्या या इलेक्ट्रिक SUV ला लाँचिंगनंतर भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्रवासी EV सोबत म्हणजेच Tata Nexon EV सोबत मोठी स्पर्धा करावी लागेल. तसेच MG ZS EV हीदेखील एक इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात चांगली कामगिरी करत आहे.

इलेक्ट्रिक स्केटबोर्डची उपस्थिती ऑप्टिमल बॅटरी पॅकेजिंग सक्षम करेल आणि लांब व्हीलबेस म्हणजेच एक मोठी केबिन यात मिळेल. टोयोटा SUV चं डिझाईन bZ4X वरून घेतलं जाऊ शकतं, जी मॉड्युलर eTNGA प्लॅटफॉर्मवर आधारित जपानी कंपनीची पहिली डेडिकेटेड इलेक्ट्रिक क्रॉसओवर आहे. या दशकाच्या मध्यापर्यंत, SUV 2WD आणि AWD कॉन्फिगरेशनमध्ये विकल्या जातील.

अपकमिंग टोयोटा इलेक्ट्रिक कारचे स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्ससाठी, 48 kWh बॅटरी पॅक आणि एक इलेक्ट्रिक मोटर 138 hp पंप करेल आणि 400 किमीच्या अंदाजे ड्रायव्हिंग रेंजसाठी ही बॅटरी पुरेशी असेल, तर यातली मोठा 59 kWh बॅटरी पॅक 170 hp पॉवर जनरेट करणार्‍या दोन इलेक्ट्रिक मोटर्सला पॉवर देईल. ज्याद्वारे ही कार सिंगल चार्जवर किमान 500 किमीपर्यंतची रेंज देईल

येत्या काही महिन्यांत नवीन विटारा ब्रेझ्झा कार सादर केल्यानंतर, टोयोटा हेवी अपडेटेड अर्बन क्रूझर लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. या वर्षाच्या शेवटी, ह्युंडई क्रेटाशी थेट स्पर्धा करण्यासाठी DNGA प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन मध्यम आकाराची SUV असेल.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.