Innova Crysta : अख्ख बॉलिवूड आहे ‘या’ कारवर फिदा… पोटातलं पाणीदेखील हलत नाही….

दमदार इंजीन, स्टायलिश लूक, कंफर्टेबल सीट, आकर्षक फिचर्स आदी विविध कारणांमुळे टोयोटा इनोवा क्रिस्टा सध्या बॉलिवूडच्या गळ्यातीत ताईत बनली आहे. अनेक बॉलिवूड कलाकार क्रिस्टाला पसंती देत असल्याचे दिसत आहे. एमपीवी सेगमेंटमध्ये भारतातील सर्वात विश्‍वसनीय कार म्हणून इनोवा क्रिस्टाकडे पाहिले जात आहे.

Innova Crysta : अख्ख बॉलिवूड आहे ‘या’ कारवर फिदा... पोटातलं पाणीदेखील हलत नाही....
इनोवा क्रिस्टाImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:47 AM

चारचाकी वाहनांच्या इतिहासात अशा अनेक कार आहेत, ज्यांना पुढारी, बिझनेसमन, बॉलिवूड (bollywood) स्टार आदींकडून विशेष पसंती दिली गेली आहे. राजकारणाचा विचार केल्यास पूर्वी अँबेसिडरचा प्रामुख्याने वापर होत होता. त्यानंतर बदलत्या काळानुसार, सफारी, स्कार्पिओ, इनोवा, फॉर्च्युनर, फोर्डच्या विविध गाड्या आदींना पसंती दिली जाते. त्यासोबतच बॉलिवूडचा विचार केल्यास बहुतेक सेलिब्रिटी मर्सडिज्‌, ऑडी, बीएमडब्लू, फरारी आदी गाड्यांना पसंती देत असतात. मात्र या सगळ्यांमध्ये सध्या बॉलिवूडमध्ये एका कारचं नाव खूप चर्चेत येत आहे. ती म्हणजे इनोवाची क्रिस्टा. (Innova Crysta) दमदार इंजीन आकर्षक लूक, लो कॉस्ट मेंटेनेन्स आदी कारणांमुळे बॉलिवूडच्या सेलिब्रिटींकडून (Celebrities) या कारला मागणी वाढली आहे. एमपीवी क्वालिसनंतर इनोवाला रिप्लेस करण्यात आले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात एमपीवी सेगमेंटमध्ये टोयोटा इनोवा आणि इनोवा क्रिस्टा ग्राहकांच्या पसंतीला उतरल्या आहेत.

दमदार व पॉवफूल इंजीन

चारचाकी वाहनांमध्ये टोयोटा हा एक प्रसिध्द ब्रांड आहे. या कंपनीच्या केवळ नावाने गाड्या विकल्या जातात, अशी ख्याती निर्माण झालेली आहे. रस्त्यांवर तुम्ही प्रत्येक दुसरी तिसरी गाडी ही इनोवा आणि क्रिस्टा पाहू शकतात. यासोबत या गाड्यांना एक विश्‍सनीय व मजबूत इंजीन देण्यात आले आहे. या कार विनाकाही अडचणींच्या लाखो किलोमीटरचा प्रवास अगदी सहज करु शकतात. यातील डी-4डी इंजीन इतके मजबूत आहे, की केवळ रेग्युलर सर्व्हिससोबत ही कार लाखो किलोमीटरचे अंतर गाठते. बॉलिवूड स्टार मलायका अरोराला नेहमी पेट्रोल व्हेरिएंटमधील इनोवा क्रिस्टामधून प्रवास केल्याचे पाहिले जाते.

आरामात प्रवास करा

इनोवाचा लेडर फेम चेसिस फ्लेक्सिबल आणि आरामदायक आहे. त्यामुळ प्रवास करताना कुठल्याही अडचण येत नाही. या कारला जबरदस्त मजबूत सस्पेंशन देण्यात आले आहे. या माध्यमातून कुठल्याही ओबडधोबड रस्त्यावरुन जातानाही या कारमधील प्रवाशांच्या पोटातील पाणीही हलत नाही. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी तुम्ही इनोवाच्या कार्सना प्राधान्य देउ शकतात. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमीर खानकडेही अनेक लक्झरी कार्स आहे, शिवाय त्याकडे टोयोटा इनोवा आणि फॉर्च्युनरदेखील आहे.

मेंटेनेन्सची चिंता नाही

कुठलीही कार खरेदी करताना तिचे मेंटेनेन्स किती आहे, हे पाहूनच तिची खरेदी केली जात असतो. टोयोटाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास टोयोटा आपल्या ग्राहकांना त्याच्या वापरानुसार, मल्टीपल सर्व्हिस आणि मेंटेनेन्स पॅकेज देत असते. त्यामुळे या गाडीचा मेंटेनेन्स खर्च कमी होतो. शिवाय मुळात या गाडीचा मेंटेनन्स अगदी कमी असल्याने अनेक जण इनोवाला पसंती देत असतात. प्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॉफदेखील टायोटा इनोवाचा वापर करताना पाहिले गेले आहेत.

आकर्षक लूक आणि फिचर्स

टोयोटा इनोवाला रिप्लेस करुन इनोवा क्रिस्टाला नव्या लूक व आकर्ष फिचर्समध्ये बाजारात दाखल करण्यात आले आहे. कंपनीने यामध्ये एलईडी प्रोजेक्टर, हेडलँप, ॲबिअंट लाइटिंग रिअर एसी डिजिटल डिसप्ले, लेदर सीट, वुडन इंसर्ट आदी प्रिमिअम फिचर्स दिले आहेत. यामुळे इनोवा क्रिस्टाने आपला दबदबा निर्माण केला आहे. बॉलिवूड ॲक्टर गुलशन ग्रोवर देखील या कारमध्ये प्रवास करण्याचा आनंद घेताना दिसून आले आहेत.

इतर बातम्या

MPSC : एमपीएसीच्या परीक्षेच्या उत्तरसुचीत चुका, लोकसेवा आयोगाकडे विद्यार्थ्यांनी सादर केले पुरावे

जिरे, धणे आणि बडीशेपच्या पेयाचे सेवन करा आणि हे आरोग्य फायदे मिळवा!

Nashik-Pune railway : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी प्रती हेक्टरी मिळणार सव्वाकोटी; शेतकऱ्यांचा विरोध मावळणार का?

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....