New Fuel : अरारा खतरनाक, कारचं काय घेऊन बसलात, या नवीन इंधनावर रेल्वे पण धावणार
New Fuel : तुम्ही कधी विचार केला की तुमचं वाहन विना पेट्रोल-डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक बॅटरी धावले?वाहनचं नाही तर रेल्वे सुद्धा आता नवीन इंधनावर धावेल..
नवी दिल्ली : इंधनाबाबत मोठं अपडेट येत आहे. देशात लवकरच वाहनं पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी (Petrol Diesel CNG) विना धावतील. पारंपारिक इंधनाचा स्त्रोत आटत आहेत. पुरवठा कमी होत आहे. पेट्रोल-डिझेल कधी तरी संपणारच आहे. ते दिवस फार दूर नाहीत. त्यामुळे जगभरात पर्याय शोधण्यास सुरुवात झाली आहे. नैसर्गिक गॅसचा पहिल्यांदा पर्यायी वापर सुरु झाला. सीएनजी, एलपीजी वाहनं आली. त्यानंतर आता इलेक्ट्रिक वाहनं येऊ घातली आहेत. काही कंपन्यांनी दुचाकी आणि चारचाकी बाजारात उतरवल्या आहेत. पण प्रत्येकाच्या काही मर्यादा आहेत. त्यावर काम सुरु आहे. आता आणखी एक पर्याय समोर आला आहे. या नवीन इंधनावर (Fuel) चारचाकीच नाही तर रेल्वे पण धावेल. काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन..
काय आहे अपडेट कारसंबंधी नवीन अपडेट समोर आले आहे. देशात लवकरच विना पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी वाहन धावतील. आता हायड्रोजनवर (Hydrogen Cars) वाहनं धावतील. त्यासाठी केंद्र सरकार मोठी तयारी करत आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन करण्यासंबंधी नवीन अपडेट समोर येत आहे.
केंद्राची अधिसूचना हायड्रोजनवर वाहनं चालविण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्यासाठी एक अधिसूचना काढली आहे. ताज्या अपडेटनुसार, हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन सुरु करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. M आणि N श्रेणीतील वाहनांसाठी Hydrogen IC इंजिनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यासाठी कंपन्यांकडून सूचना, मत मागविण्यात आले आहे.
हायड्रोजन बस काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, देशात हायड्रोजनवर धावणाऱ्या बस दिसतील. बायोगॅस योजनेवर प्रभावीपणे काम सुरु आहे. लवकरच भारत हा ऊर्जा विक्रीचा मोठा निर्यातक देश होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एमजीची हायड्रोजन कार यावर्षी देशात सर्वात मोठा Auto Expo 2023 झाला. यामध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार आणल्या. तर मॉरिसन गॅरेज म्हणजे एमजी हेक्टरने हायड्रोजन फ्यूएल सेलवर चालणारी कार Euniq 7 सादर केली.
कारच नाही तर ट्रेन सुद्धा देशात हायड्रोजन कारच नाही तर हायड्रोजन ट्रेन पण सुरु होत आहे. त्यासाठी फार वाट पाहण्याची गरज नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची घोषणा केली आहे. डिसेंबर 2023 मध्ये हेरिटेज रुट्सवर हायड्रोजन ट्रेन (Hydrogen Train) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे हेरिटेड साईट प्रदुषण मुक्त होतील आणि निसर्गावरचा ताण कमी होईल.
स्वस्त इंधनाचा पर्याय देशात पेट्रोल-डिझेलचा भाव गगनाला भिडलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलचा भाव 100 रुपयांपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षभरापासून इंधनात दरवाढ झाली नसली तरी दर कपात पण करण्यात आलेली नाही. त्यामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त असताना भारतात पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांचा खिसा कापण्यात येत आहे.