Triumph Tiger Sport 660 price and booking : जर्मन ऑटोमोबाईल निर्माता Triumph ने आपल्या लेटेस्ट मोटरसायकलसाठी बुकिंग्स घेणे सुरु केले आहे. ट्रायम्फ टायगर स्पोर्ट 660 ची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. तुम्ही फक्त 50,000 रुपये टोकन अमाऊंट भरुन ही मोटारसायकल बुक करू शकता. मात्र, कंपनीने अद्याप लॉन्च डेट जाहीर केलेली नाही. (Triumph Tiger Sport 660 bookings open in India: will Launch soon)
ट्रायम्फने या एंट्री-लेव्हल मॉडेलसाठी प्री-ऑर्डर स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मोटारसायकल निर्मात्या कंपनीने भारतात आगामी ट्रायम्फ बाइकसाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ही बाईक लॉन्च केली जाईल असे संकेत आहेत.
टायगर स्पोर्ट 660 ही एक अॅडव्हेंचर स्पोर्ट टूरिंग मोटरसायकल आहे जी ऑफ-रोड ओरिएंटेड एडीव्हीऐवजी स्पोर्ट टूरिंगसाठी डिझाइन केलेली आहे आणि ती ट्रायडंट 660 प्लॅटफॉर्म एक्सटेंड करते. ही बाईक ट्रायडंट 660 वर आधारित असली तरी, टूरिंग मशीनचा भाग दिसतो. यामध्ये स्पोर्टी दिसणारी हाफ-फेअरिंग, स्ट्रेट रायडिंग पोजिशन, सस्पेन्शन ट्रॅव्हल, सीटची उंची आणि टूरिंग एबिलिटीसाठी रेनफोर्स्ड सब-फ्रेम्स समाविष्ट आहेत. त्याची रचना आकर्षक आहे पण ती टायगर 900 सारखी नाही. मोटारसायकलमध्ये ट्विन एलईडी हेडलॅम्प आणि टायगर स्पोर्ट 660 च्या टूरिंग क्रेडेंशियल्ससह उंच हाईट-अॅडजस्टेबल विंडशील्ड आहे.
इतर बातम्या
ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी
चिप संकटावर TATA चा मोठा निर्णय, ‘या’ 3 राज्यांमध्ये प्लांट उभारण्याची तयारी
सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर
(Triumph Tiger Sport 660 bookings open in India: will Launch soon)