AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धूमsssss! टीव्हीएसच्या या बाइकची जोरदार चर्चा, रॉयल एनफिल्डशी असेल थेट स्पर्धा

टीव्हीएसनं भारतीय बाजारात एका पेक्षा एक सरस मॉडेल सादर केले आहेत. प्रीमियम व्हेरियंटमध्ये अपाचे आरआर 310 नियो रोनिन बाइक्स सादर केली आहे.

धूमsssss! टीव्हीएसच्या या बाइकची जोरदार चर्चा, रॉयल एनफिल्डशी असेल थेट स्पर्धा
Royal Enfield शी स्पर्धा करणार टीव्हीएसची ही बाइक, इंजिन आणि फीचर्सबाबत जाणून घ्याImage Credit source: प्रातिनिधीक फोटो (TVS)
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 3:15 PM

मुंबई : ऑटो कंपन्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भारतात चारचाकीच्या तुलनेत दुचाकींना सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे ऑटो कंपन्यांची चढाओढ लागली आहे. आता टीव्हीएस कंपनीने भारतीय बाजारात आणखी एक मॉडेल सादर करण्याची तयारी सुरु केली आहे. टीव्हीएस मोटर कंपनी बाइक सेगमेंटमध्ये 600 सीसी ते 750 सीसी इंजिन असलेली बाइक आणण्याच्या तयारीत आहे. ही गाडी ट्विन सिलेंडर सेटअपसह सादर केली जाणार आहे.

माहितीनुसार, 650 सीसी इंजिन असलेली नवी टीव्हीएस बाइक 47 बीएचपीची पॉवर आणि 52 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. ही गाडी युकेच्या नॉर्टन मोटरसायकल कंपनीसोबत एकत्र येत डेव्हलप केली आहे. लाँचिंगनंतर थेट रॉयल एनफिल्ड 650 सीसी बाइकशी स्पर्धा करणार आहे. यात इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेन्टल जीटी 650 या गाड्यांचा समावेश आहे.

कंपनीने या बाइकच्या निर्मितीवर जोर लावला आहे. मात्र कोणतेही डिटेल्स शेअर केलेले नाहीत. टीव्हीएस कंपनीची 650 सीसी बाइक सर्वात महागडी बाइक असण्याची शक्यता आहे.

मागच्या आठवड्यात टीव्हीएसने गोव्यात बाइकिंग फेस्टिवल टीव्हीएस मोटोसोल 2023 आयोजन केलं होतं. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात रोनिन प्लॅटफॉर्मवर 4 कस्टमाइज्ड बाइक सादर करण्यात आल्या. यात टीव्हीएस रोनिन अगोंडा, टीव्हीएस रोनिन मुसाशि, टीव्हीएस रोनिन एससीआर या बाइकचा समावेश आहे.

टीव्हीएस रोनिन एससीआरबाबत सांगायचं तर, या बाइकमध्ये रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत सस्पेंशन स्पेपर्स आणि हाय ग्राउंड क्लियरन्स स्क्रॅम्बलर बाइक आहे. सेमी नॉबी शिंको टायर, वायर स्पोक व्हील्समुळे ही बाइक वेगळी दिसते. या बाइकमध्ये हाय माउंटेड एग्जॉस्ट सिस्टमसुद्धा आहे.

टीव्हीएस रॉनिन एससीआरमध्ये ट्वीन पॉड इंस्ट्रुमेंट क्लस्टर आहे. या व्यतिरिक्त हायलाइट्समध्ये ट्वीड एलईडी हेडलँप, वर असलेला फ्रंट बीक, नवीन बॉडी स्ट्रक्चर आणि सिंगल सीट आहे. पण असं असलं तरी टीव्हीएस रॉनिन एससीआरची निर्मिती करण्याचा विचार नाही. मोटोसोल कार्यक्रमात सादर केलेली ही बाइक कित्येक फीचर्सला सपोर्ट करते.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.