TVS Radeon: TVS ने लाँच केली बजट बाईक… ‘हे’ पाच फीचर्स आहेत खास

बजेट बाईक खरेदी करणार्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीव्हीएस मोटर्सने नुकतीच आपली एक बजेट बाईक लाँच केली आहे. बजेट बाईक असूनही त्यात अनेक महत्वाचे फीचर्स जोडण्यात आले आहेत. जुन्या मॉडेलच्या तुलनेत यात तब्बल 18 फीचर्स अधिक देण्यात आले आहेत.

TVS Radeon: TVS ने लाँच केली बजट बाईक... ‘हे’ पाच फीचर्स आहेत खास
TVS RadeonImage Credit source: Official Website
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 2:00 PM

टीव्हीएस (TVS) मोटर्स कंपनीने या आठवड्यात आपली न्यू एंट्री लेव्हलची बाइक़ लाँच केली आहे. हे TVS Radeon चे नवीन व्हेरिएंट आहे. यामध्ये जुन्या व्हेरिएंटच्या (new variant) तुलनेमध्ये 16 नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत. ज्यात, एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टरशिवाय ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीचाही समावेश करण्यात आलेला आहे. या मोटरसायकलची स्पर्धा अनेक स्पर्धक बजेट बाईकशी होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बाईक मार्केटचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्याचे दिसून येत आहे. त्यात, विविध कंपन्यांनी आपआपल्या बाईक्समध्ये अत्याधुनिक फीचर्स (Features) दिले असल्याने साहजिकच स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक दुचाकी निर्मात्या कंपन्या आपल्या मॉडेलमध्ये अपग्रेड व्हर्जन आणत आहेत. या लेखातून TVS Radeon च्या काही खास फीचर्सबाबत चर्चा करणार आहोत.

  1. न्यू इंस्ट्रूमेंट कंसाल : भारतीय कंपनीने या अपडेट मॉडेलमध्ये नवीन डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोलचा वापर केला आहे. यात एकूण 18 फीचर्स दिसून आले आहेत. यात, टायमिंग, एवरेज स्पीड, लॉ बॅटरी इंडिकेशन, सर्व्हिस इंडिकेशन, रियर टाइम फ्यूअल इकॉनॉमीसह टॉप स्पीडबाबतही माहिती मिळणार आहे.
  2. स्टार्ट/स्टॉप सिस्टीम : या दुचाकीमध्ये Intelligo Start/Stop ही एक खास प्रकारची सिस्टीम देण्यात आली असून या सिस्टीमचा मुख्य उद्देश फ्यूअल इकॉनॉमीला अधिक चांगले बनविणे आहे. ही सिस्टीम बाईकला एक आयडीअल कंडिशनवर बंद करण्याचा पर्याय उपलब्ध करते, ज्याच्या माध्यमातून इंधन बचत होण्यास मदत होते.
  3. परफॉर्मेंस : मेकेनिकल पार्ट्‌सबाबत बोलायचे झाल्यास कंपनीने या बाइकच्या इंजिन कपॅसिटीमध्ये मोठे बदल केल्याचे दिसून येत आहे. या फोनमध्ये 109.7 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. ही एअर कूल्ड बीएस 6 वर काम करत असून हे इंजिन 8.08 बीएचपीची पॉवर आणि 8.7 एनएमचा टॉर्क जनरेट करु शकते. यात 4 स्पीड ट्रांसमिशन देण्यात आले आहे.
  4. व्हेरिएंट : टीव्हीएसने आपल्या या लेटेस्ट बाइकला चार व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. यात सुरुवातीची किंमत 59925 रुपये असणार आहे. यात सिंगल ड्रम व्हेरिएंटसह एलसीडी क्लस्टर मिळणार असून 71966 ड्युअल टोन डिस्क ब्रेकसह एलसीडी क्लस्टर देण्यात येत आहे. अन्य दोन व्हेरिएंटमध्ये ड्युअल ट्रिमसह रिव्हर्सचे फीचर्स आणि चौथ्या व्हेरिएंटमध्ये ड्युअल टोन डिस्क ट्रिसह रिव्हर्सचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. डिझाईन : व्हिज्युअल बदलांबाबत बोलायचे झाल्यास, 2022 टीव्हीएस रेडियोन एक रेट्रो स्टाइल सिंगल पॉड हेडलँपसह बॉडी कलर काउल देण्यात आले आहे. यामध्ये माउंटेड एक्सजोस्ट सिस्टीम देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.