TVS Ntorq 125 चं स्पेशल Marvel Spider-Man एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या नव्या स्कूटरमध्ये काय आहे खास?

TVS मोटर कंपनीने TVS NTORQ 125 Super Squad Edition अंतर्गत मार्व्हल स्पायडर-मॅन आणि थॉर द्वारे प्रेरित स्कूटर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. नवीन स्कूटर्स मार्व्हल सुपर हिरोज - आयर्न मॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांच्यापासून प्रेरित सुपर स्क्वॉड एडिशनमध्ये सामील होतील

TVS Ntorq 125 चं स्पेशल Marvel Spider-Man एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या नव्या स्कूटरमध्ये काय आहे खास?
TVS Ntorq 125
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 6:00 AM

TVS NTORQ 125 Scooter Launch in India : TVS मोटर कंपनीने TVS NTORQ 125 Super Squad Edition अंतर्गत मार्व्हल स्पायडर-मॅन आणि थॉर द्वारे प्रेरित स्कूटर लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. नवीन स्कूटर्स मार्व्हल सुपर हिरोज – आयर्न मॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांच्यापासून प्रेरित सुपर स्क्वॉड एडिशनमध्ये सामील होतील, जी गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आली होती. कंपनी TVS Ntorq 125 च्या SuperSquad व्हर्जनसाठी Disney India च्या कंज्यूमर प्रोडक्ट्सच्या व्यवसायाशी जोडली गेली आहे, जी RT-Fi तंत्रज्ञानासह भारतातील पहिली ब्लूटूथ कनेक्टेड स्कूटर आहे. (TVS Ntorq 125 SuperSquad Edition With Spider-Man, Thor Launched in India)

स्पेशल एडिशनमध्ये सर्व प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरचं इंजिन 7500 rpm वर 9.4 PS ची पॉवर आणि 5500 rpm वर 10.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. याच्या इंजिनला CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे 1861 मिमी लांब, 710 मिमी रुंद आणि 1164 मिमी उंच आहे. तर त्याचा व्हीलबेस 1285mm आहे. त्याची ग्राउंड क्लीयरन्स 155 मिमी आहे. या स्कूटरचं कर्ब वेट 118 किलो आहे.

TVS NTorq 125 स्कूटरमध्ये काय आहे खास

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या या स्कूटरमध्ये 5 इंचांचा एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यामध्ये लॅप टायमर, 0-60kph एक्सिलरेशन टाइम रेकॉर्डर, टॉप स्पीड रेकॉर्डर, इंजिन टेम्परेचर गॉज, अॅव्हरेज स्पीड इंडिकेटर आणि सर्व्हिस रिमाइंडर दर्शवले जाते.

या स्कूटरची ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी रायडरला ‘Smart Xonnect’ द्वारे त्याचा फोन स्कूटरशी जोडण्याची परवानगी देते. याद्वारे रायडर त्याच्या फोनवरील सर्व डेटा तपासू शकतो. याशिवाय फोन आपल्या एलसीडी डिस्प्लेमध्ये नोटिफिकेशन, ट्रिप रिपोर्ट आणि नेव्हिगेशन अॅरोदेखील दर्शवले जाते.

किंमती

भारतात TVS Ntorq 125 च्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटसाठी 71,095 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर डिस्क ब्रेक व्हेरिएंटसाठी 75,395 रुपये, तर Ntorq 125 च्या रेस व्हेरिएंटसाठी आणि सुपरस्क्वेअर व्हेरिएंटसाठी अनुक्रमे 78,375 आणि 81,075 रुपये मोजावे लागतील. Super Squad Edition मधील व्हेरिएंट्सच्या किंमती यापेक्षा थोड्या जास्त असतील.

इतर बातम्या

Mileage Cars : सेलेरियो ते टाटा पंच.., 2021मध्ये लॉन्च झालेल्या ‘या’ आहेत जबरदस्त टॉप पेट्रोल कार

NCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Verna सपशेल नापास, कारला 0-स्टार सेफ्टी रेटिंग

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हरवलंय? जाणून घ्या डुप्लिकेट RC बनवण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत

(TVS Ntorq 125 SuperSquad Edition With Spider-Man, Thor Launched in India)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.