TVS Star City Plus चं नवं वेरिएंट लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
टीव्हीएस मोटर कंपनीने 2021 टीव्हीएस स्टार सिटी प्लस कम्यूटर मोटरसायकल नवीन ड्युअल ट्यून कलरसह लॉन्च केली आहे.
मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने 2021 टीव्हीएस स्टार सिटी प्लस (TVS Star City Plus) कम्यूटर मोटरसायकल नवीन ड्युअल ट्यून कलरसह लॉन्च केली आहे. ज्यामध्ये पर्ल ब्लू-सिल्व्हरचा समावेश आहे. नवीन रंगांसह या मोटरसायकलचे डिस्क आणि ड्रम दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध होईल, असे टीव्हीएसने म्हटले आहे. (TVS Star City Plus new variant launched, know its features and price)
स्टार सिटी प्लसच्या किंमती नवीन रंगासह 65,865 रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होतात. 2021 टीव्हीएस स्टार सिटी प्लस या महिन्याच्या सुरुवातीला टीव्हीएसच्या ईटी-फाय तंत्रज्ञानासह (इकोट्रस्ट फ्यूल इंजेक्शन) लॉन्च करण्यात आली होती, ज्याद्वारे 15 टक्के इंधनाची बचत होईल, असे म्हटले जात आहे. यात एलईडी हेडलाइट आणि यूएसबी मोबाइल चार्जर देखील उपलब्ध आहे. टीव्हीएसच्या मते, स्टार सिटी प्लसकडे 30 लाखांहून अधिक कस्टमर बेस (ग्राहक संख्या) आहे. या बाईकचं नवं व्हेरिएंट बाईकची विरासत पुढे नेईल, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.
टीव्हीएस स्टार सिटी प्लसचे फीचर्स
- टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाईक 110 सीसी, सिंगल-सिलेंडर, फ्यूल-इंजेक्टेड इंजिनवर चालते जे 7,350 आरपीएम वर 8.08 बीएचपी पॉवर आणि 4,500 आरपीएम वर 8.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं.
- स्टार सिटी प्लस जास्तीत जास्त 90 किमी प्रतितास वेगाने धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. ही बाईक 4-स्पीड ट्रांसमिशनसह सादर करण्यात आली आहे.
- सस्पेंशन ड्युटीला टेलिस्कोप फ्रंट फोर्क आणि 5-फेज अॅडजस्टेबल रियर शॉकद्वारे कंट्रोल केलं जातं.
- ट्यूबलेस टायर्ससह बाईकमध्ये 17 इंचाची चाके देण्यात आली आहेत.
- कलर ऑप्शन्सच्या डिटेल्ड सिरीजसह फ्युल एफिशिएंट इंजिन आणि लो कर्ब वेटसह टीव्हीएस स्टार सिटी प्लस एक शानदार व्हॅल्यू फॉर मनी, एंट्री लेव्हल मोटारसायकल आहे.
कंपनीने अलीकडेच जॅग्वार लँड रोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर राल्फ स्पॅथ यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. टीव्हीएसच्या निवेदनानुसार, जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगाचे आयकॉन प्रोफेसर राल्फ स्पॅथ यांना भविष्यातील योजनेसाठी नियुक्त केले गेले आहे. टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष विनू श्रीनिवासन यांनी 1980 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. श्रीनिवासन हे दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या जगातील टॉप पाच निर्मात्यांपैकी एक आहेत.
हेही वाचा
Honda ची आफ्रिका ट्विन अॅडव्हेन्चर भारतात दाखल, जाणून घ्या नवे फिचर्स
(TVS Star City Plus new variant launched, know its features and price)