मुंबई-पुणे महामार्गावर Tesla Model 3 चं दर्शन, भारतातील लाँचिंगसाठी कंपनीची जय्यत तयारी

भारत सरकार आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्यात आयात शुल्काबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही, ज्यामुळे कारचे भारतातील लाँचिंग विलंबाने होऊ शकते.

मुंबई-पुणे महामार्गावर Tesla Model 3 चं दर्शन, भारतातील लाँचिंगसाठी कंपनीची जय्यत तयारी
Tesla-Model-3
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 3:45 PM

मुंबई : भारत सरकार आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्यात आयात शुल्काबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही, ज्यामुळे कारचे भारतातील लाँचिंग विलंबाने होऊ शकते. पण आता असे दिसतेय की, लवकरच टेस्ला त्यांच्या भारतीय चाहत्यांना चांगली बातमी देऊ शकते. खरं तर, अलीकडेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन टेस्ला मॉडेल 3 कार पाहायला मिळाल्या आहेत, ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, ही कार लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. (Two Tesla Model 3 cars spotted on Mumbai Pune Expressway, Elon Musk Planning to huge launch)

खरं तर, टेस्ला क्लब इंडिया (Tesla Club India) नावाच्या अनधिकृत हँडलने दोन कॅमोफ्लॉज्ड मॉडेल 3 टेस्ट व्हीकल्सचे फोटो ट्विट केले आहेत. एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दोन गोपनीय मॉडेल 3 टेस्ट यूनिट्स. पूर्वी पाहिल्याप्रमाणे टेस्टिंग उपकरणासह. 337 नवीन दिसते. ग्राउंड क्लिअरन्स वाढवला गेला आहे की फक्त प्रतिमेचा प्रश्न आहे?”

यासह, पुढील ट्वीटमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, “हे स्थान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील स्टारबक्सजवळ सुपरचार्जर पार्किंगचे संभाव्य ठिकाण आहे.”

भारतातील लाँचिंगसाठी कंपनीचं प्लॅनिंग

यापूर्वी ब्लू टेस्ला मॉडेल 3 पुण्याच्या रस्त्यावर पाहायला मिळाली होती, जी चीनच्या शांघायमधील त्याच्या गीगा फॅक्टरीमधून आणली होती. टेस्ला या वर्षी भारतात आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना आखत असल्याने, एलन मस्क संचालित कंपनीने देशात वरिष्ठ कार्यकारी अधिकारी नियुक्त केले आहेत, ज्यांनी देशातील काही कारभार आपल्या हाती घेतला आहे. तथापि, आयात शुल्कावरून सुरू असलेल्या वादामुळे टेस्ला मॉडेल 3 लाँच होण्यास विलंब होऊ शकतो.

$ 39,990 (अंदाजे 30 लाख रुपये) इतक्या किंमतीसह, टेस्ला मॉडेल 3 अमेरिकेत परवडणारे मॉडेल म्हणून उपस्थित आहे, परंतु कोणतेही आयात शुल्क न घेता, भारतात अंदाजे 60 लाख रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असेल. ही किंमत भारतीय बाजारात परवडण्यायोग्य नाही.

इतर बातम्या

शानदार फीचर्ससह टाटा मोटर्सची सर्वात छोटी SUV लाँचिंगसाठी सज्ज, Creta, Seltos ला टक्कर

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरात परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

(Two Tesla Model 3 cars spotted on Mumbai Pune Expressway, Elon Musk Planning to huge launch)

Non Stop LIVE Update
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.