भारतीयांची फेव्हरेट Mahindra Bolero नव्या रुपात याच महिन्यात लाँच होणार, फोटोज आणि फीचर्स लीक
महिंद्रा बोलेरो निओचे (Mahindra Bolero Nio) अनेक फोटो लीक होत आहेत. या कारचे अनेक फीचर्स याआधीच सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत.
मुंबई : महिंद्रा बोलेरो निओचे (Mahindra Bolero Nio) अनेक फोटो लीक होत आहेत. या कारचे अनेक फीचर्स याआधीच सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत. कंपनी हे वाहन 15 जुलैला लाँच करणार आहे. अशा परिस्थितीत लीक झालेल्या फोटोंवरुन वाहनाच्या एक्सटीरियरची झलक पाहायला मिळत आहे. कंपनीने या कारची केबिनसुद्धा अपडेट केली आहे. नवीन बोलेरो निओ महिंद्रा TUV300 वर आधारित कार आहे. यात आपल्याला बॉक्सी प्रोफाइल मिळेल परंतु कारच्या फ्रंट आणि रियरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. (Upcoming Mahindra Bolero Neo photos online leaked, before its launch)
सूत्रांवर विश्वास ठेवायचा तर कंपनीने या एसयूव्हीमध्ये बरेच बदल केले आहेत. सध्याच्या टीयूव्ही 300 च्या तुलनेत कंपनीने नवीन बोलेरो निओच्या फ्रंटमध्ये बरेच बदल केले आहेत. यासाठी यामध्ये री-प्रोफाइल्ड हायलाइट्स, अपडेटेड ग्रिल, नवीन फ्रंट बंपर्स आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. नवीन बोलेरो निओला काही क्लासिक बोलेरो डिझाइन्स जसे की क्लॅम-शेल बोनेट यांसह, काही किरकोळ बदलांशिवाय रियरमध्ये फारसे बदल केले नाहीत.
2021 Mahindra Bolero Neo चं इंजिन
महिंद्रा बोलेरो निओच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये टीयूव्ही 300 सारखे बीएस 6 कम्पलायंट 1.5 लीटर थ्री सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 100 एचपी पॉवर आणि 240Nm टॉर्क जनरेट करेल. यासोबतच या इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध असेल. याशिवाय या एसयूव्हीमध्ये फ्यूल-सेव्हिंग, इंजिन स्टार्ट-स्टॉप फीचर दिले जाऊ शकते, जे यापूर्वी टीयूव्ही 300 मध्ये देण्यात आले होते.
2021 Mahindra Bolero Neo ची किंमत
या एसयूव्हीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 2021 महिंद्रा बोलेरो निओची किंमत त्याच्या स्टँडर्ड मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते. या एसयूव्हीची किंमत 9 ते 12 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. निओच्या माध्यमातून कंपनी अशा ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यांना नियमित बोलेरोपेक्षा अधिक कम्फर्ट हवा आहे. यासह महिंद्रा असादेखील विचार करीत आहे की, निओचे (Neo) नवीन ‘बोलेरो’ (Bolero) नेमप्लेट ग्राहकांना या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये अधिक रस दर्शविण्यास मदत करेल.
महिंद्रा 9 नवी वाहनं लाँच करणार
दरम्यान, महिंद्राने पुष्टी केली आहे की, कंपनी न्यू जनरेशन थारचं (Mahindra Thar) 5-डोर व्हेरिएंट लाँच करणार आहे. तसेच महिंद्राने जाहीर केलं आहे की, कंपनी 2026 पर्यंत नऊ नवीन उत्पादने लाँच करणार आहे आणि 5-डोर थार हे त्यापैकीच एक उत्पादन असेल. 5-डोर थारच्या लाँचिंगची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु कंपनीने याची पुष्टी केली आहे की नवीन महिंद्रा थार 5-डोर मॉडेल 2023 आणि 2026 च्या दरम्यान लाँच केलं जाईल. या काळात कंपनी न्यू जनरेशन महिंद्रा बोलेरो, बॉर्न ईव्ही प्लॅटफॉर्मवर बेस्ड काही इलेक्ट्रिक वाहनं, न्यू जनरेशन एक्सयूव्ही 300 आणि दोन नवीन मॉडेल्स लाँच करु शकतं. W620 आणि V201 अशी या दोन मॉडेल्सची नावं आहेत.
इतर बातम्या
Maruti च्या गाड्यांसाठी घरबसल्या लोन मिळणार, एक्सचेंज व्हॅल्यूसाठी शोरुममध्ये जाण्याची गरज नाही
Renault कारवर मिळवा 65,000 पर्यंत सूट, त्वरा करा! फक्त 31 जुलैपर्यंत ऑफर
(Upcoming Mahindra Bolero Neo photos online leaked, before its launch)