जगातील पहिल्या Flying Car ला मंजुरी, ना ट्रॅफिक जामची कटकट, ना सिग्नलची झंझट

आकाशात उडणारी कार पाहण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. (Terragufia Transition Flying Car)

जगातील पहिल्या Flying Car ला मंजुरी, ना ट्रॅफिक जामची कटकट, ना सिग्नलची झंझट
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 3:06 PM

वॉशिंग्टन डी.सी. : आकाशात उडणारी कार पाहण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडून (AFAA) टेरागुफिया ट्रान्झिशन फ्लाइंग कारला (Terragufia Transition Flying Car) स्पेशल लाइट-स्पोर्ट एयरक्राफ्ट एयरवर्थनेसचे (Special Light-Sport Aircraft Airworthiness) प्रमाणपत्र मिळाले आहे. (US Federal Aviation approval for world first flying car Terragufia Transition)

ही कार रस्ते आणि हवाई दोन्ही मार्गाने प्रवास करण्यास सक्षम आहे. ही दोन आसनी (टू सीटर) उडणारी कार आहे जी जमिनीपासून 10,000 फूट उंचीवर उडू शकते. या कारचा वेग ताशी 161 किलोमीटर इतका आहे. या वाहनातून हवाई आणि रस्ते प्रवास करणे अगदी सोपे आहे कारण या कारचा एअर फ्लाइंग मोड एका मिनिटापेक्षा कमी वेळात रोड ड्राईव्हिंग मोडमध्ये बदलता येऊ शकतो. त्यामुळे ही कार जमिनीवर उतरविणे अगदी सोपे आहे.

खराब हवामान, हवाई रहदारी आणि बंदी असलेले हवाई क्षेत्र टाळत ही कार आपोआप गंतव्य स्थानावर (डेस्टिनेशन) पोहोचू शकते. तथापि, अद्याप या कारला हाइब्रिड ग्राउंड-एयर व्हीकल (भू-हवाई वाहनाची) मंजुरी मिळालेली नाही. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, 2022 पर्यंत ही प्रक्रियादेखील पूर्ण केली जाईल, त्यानंतर ही उड्डाण करणारी कार लाँच केली जाईल. दरम्यान, महत्वाची गोष्ट म्हणजे ही उडणारी कार चालविण्यासाठी ड्रायव्हरकडे ड्रायव्हिंग लायसन्स तसेच स्पोर्ट पायलट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

टेरागुफिया ट्रान्झिशन फ्लाइंग कारची वैशिष्ट्ये

  • टेरागुफिया ट्रान्झिशनच्या गुणवत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये हार्ड कार्बन फायबर बॉडी, लँडिंगसाठी एअरफ्रेम पॅराशूट, फोर व्हील हायड्रॉलिक डिस्क ब्रेक आणि फिक्स्ड लँडिंग गिअर आहेत. त्यामुळे ही कार अतिशय सुरक्षित मानली जाते.
  • या कारमध्ये 912iS स्पोर्टसह फ्यूल इंजेक्टेड इंजिन आहे ज्यामुळे ही कार 10,000 फूट उंचीपर्यंत उडू शकते अथवा प्रवास करू शकते.
  • या कारचं इंजिन 100LL विमानाचं फ्यूल किंवा प्रीमियम पेट्रोलसह चालू शकतं. यासह, त्यात एक हायब्रिड इलेक्ट्रिक मोटर वापरली गेली आहे.
  • टेरागुफिया ट्रान्झिशन ही सुमारे 590 किलो वजनाची कार आहे. या कारची इंधन क्षमता 76 लीटरपेक्षा जास्त आहे आणि या कारचे विंगस्पॅन (पंख) 7 फूट लांब आहेत.
  • पार्किंगसाठी जागा कमी असल्यास या उड्डाण करणार्‍या कारचे पंख दुमडता येतात.

हेही वाचा

Volkswagen च्या लोकप्रिय Polo आणि Vento चं टर्बो एडिशन लाँच, स्पोर्टी लुकसह किंमतही कमी

Renault ची किफायतशीर SUV Kiger लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील टॉप ऑटोमाबाईल कंपनीच्या वाहनविक्रीत घट, पुन्हा नंबर वन होण्यासाठी मास्टर प्लॅन

एमजी मोटर इंडियाची नवी एसयुव्ही कार लवकरच बाजारात, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास?

(US Federal Aviation approval for world first flying car Terragufia Transition)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.