Used Car Buying : या टिप्स करा फॉलो, जुनी कार खरेदी करताना नाही होणार फसवणूक

Used Car Buying : सेकंड हँड कार खरेदी करताना विशेष काळजी घेतली तर फसवणूक टळते. अनेकदा नवीन कार खरेदी करण्याचे बजेट नसते. अशावेळी चांगल्या कंडिशनची सेंकड हँड कार खरेदी करणे हा चांगला पर्याय ठरु शकतो. पण त्यासाठी काळजी घ्यावी लागेल. या टिप्स फॉलो कराव्या लागतील.

Used Car Buying : या टिप्स करा फॉलो, जुनी कार खरेदी करताना नाही होणार फसवणूक
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 6:55 PM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : एक जुनी कार, चांगल्या कंडिशनमधील खरेदी करणे खिशासाठी चांगला सौदा ठरु शकतो. त्यामुळे जादा पैसा खर्च न करता तुम्ही कारचे मालक होऊ शकता. तुमच्या रोजच्या कामासाठी कारचा वापर होऊ शकतो. पण सेकंड हँड कार खरेदी करणे हे काही सोपं काम नाही. जवळचा व्यक्ती असेल, कार पाहिलेली असेल आणि सौदा महाग नसेल तर हा पर्याय पथ्यावर पडेल. पण कार अनोळखी व्यक्तीकडून घेत असाल तर काळजी घेणे आवश्यक असते. नाहीतर हा घाट के सौदा ठरु शकतो. तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सेंकड हँड कार खरेदीसाठी या टिप्स (Second Hand Car Buying Tips) तुम्हाला फायदेशीर ठरु शकतात.

बजेट ठरवा

सेंकड हँड कार खरेदी करताना सर्वात अगोदर त्याचे बजेट ठरवा. त्या बजेटनुसार, तुम्हाला कारचा पर्याय मिळेल. या बजेटमध्ये केवळ कारच नाही तर इन्शुरन्स किती भरावा लागेल, किती थकलेला आहे, हे सर्व विचारुन तुम्ही बजेट ठरवू शकता. तसेच कार रिपेअरिंगसाठीचा खर्चही जोडू शकता. हा सर्व पर्याय समोर आल्यानंतर तुमचे बजेट कितीपर्यंत आहे हे निश्चित होते. त्याआधारे कारचा पर्याय समोर येतो.

हे सुद्धा वाचा

इंटरनेटचा वापर करा

जे मॉडल तुम्हाला खरेदी करायचे आहे, त्याची माहिती अगोदर इंटरनेटवरुन मिळवा. या मॉडलविषयी काही अडचण असल्यास, काही समस्या असल्यास त्याची माहिती मिळेल. या मॉडलविषयीची प्रतिक्रिया काय आहेत. ग्राहकांचे म्हणणे काय आहे, हे एकदा तपासा. ही कार कंपनीने परत तर मागितली नव्हती ना, याची माहिती घ्या. कार मालकाकडून कार सर्व्हिसचे आणि मेंटनेसचे पेपर घ्या. त्याआधारे कारच्या दुरुस्तीची माहिती कळेल.

कार मालकाची माहिती घ्या

कारचा मालक कोण आहे. तो काय करतो, त्याने कारचा किती वापर केला. कसा वापर केला असे न पटणारे प्रश्न सुद्धा विचारा. त्याची माहिती घ्या. ही कार चोरीची तर नाही ना, हे पण बघा. नाहीतर अनेक जण दुसऱ्याची कार स्वतःच्या नावावर खपवू शकतात. त्यामुळे चौकशीशिवाय कार खरेदी करु नका.

कार तपासून घ्या

सेंकड हँड कार तपासून घ्या. त्यासाठी ओळखतील एखाद्या मॅकेनिकची मदत घ्या. तुम्ही स्वतः या कारची टेस्ट ड्राईव्ह घ्या. या कारचा क्रमांक, चेसिसचा क्रमांक याची खात्री करुन घ्या. कारचा अपघात झाला होता का हे तपासा. ही सर्व माहिती जमा केल्याशिवाय कार खरेदी करु नका.

मायलेज किती ते पाहा

कार किती मायलेज देते, हे पाहा. त्याशिवाय कारची कामगिरी लक्षात येणार नाही. कार जर अनेकांनी वापरलेली असेल, रफ ड्राईव्हिंग असेल तर कारमध्ये अडचण येऊ शकते. कार विक्रीसाठी काही जण रीडिंग कमी जास्त करतात. त्याकडे पण लक्ष द्या. सर्व गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय, कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय, कारवरील कर्जाची माहिती घेतल्याशिवाय जुनी कार खरेदी करु नका.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.