रस्त्यावर ओव्हरटेक करणं पडू शकतं महाग… माहीत नसेल तर नियम जाणून घ्या

काही लोक रस्त्यावरून वाहन चालवताना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतात. रस्त्यावरून फक्त आपण एकटेच जात आहोत की काय असं त्यांना वाटतं. ओव्हरटेक केल्यानंतर काय होऊ शकतं हेही त्यांना माहीत नसतं. त्यामुळे हे नियम जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

रस्त्यावर ओव्हरटेक करणं पडू शकतं महाग... माहीत नसेल तर नियम जाणून घ्या
car overtakeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 12:03 PM

अनेकांना हातात गाडी आल्यावर ती सुस्साट वेगाने चालवावी वाटते. मग अशावेळी मागून येणाऱ्या आणि पुढे जाणाऱ्या वाहनांचीही पर्वा केली जात नाही. ओव्हरटेक करून पुढे जाणं हा तर अनेकांचा खेळ झाला आहे. पण रस्त्यावरून ओव्हरटेक करण्याचेही नियम असतात. या नियमांचं पालन केलं नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. तुम्हाला मोठा दंडही बसू शकतो. एकंदरीत तुम्हाला ओव्हरटेक करणं भारी पडू शकतं. देशातील सर्व राज्यात ओव्हरटेक करण्याबाबतचे नियम समान आहेत. त्यामुळे कोणत्याही वाहनाला ओव्हरटेक करण्यापूर्वी नियम काय आहेत हे जाणून घ्या.

तुम्ही जर कुणाला ओव्हरटेक केलं तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. किंवा तुमचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ओव्हरटेक करण्यापूर्वी काही नियम जाणून घ्या. काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. हे नियम तुमच्या घरातील मंडळींनाही साांगा आणि मित्रांनाही हे नियम शेअर करा. याचा कुणाला कधी फायदा होईल हे सांगता येत नाही.

योग्य जागा निवडा

ओव्हरटेक करणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट संकेत असतील अशा ठिकाणीच ओव्हरटेक करा. साधारणपणे सरळ रस्ता सुरक्षित असतो. कारण पुढच्या परिस्थितीचा अंदाज सरळ रस्त्यावरून येत असतो.

डाव्याबाजूने ओव्हरटेक नको

भारतात नेहमी ओव्हरटेक उजव्या बाजूने केला पाहिजे. डाव्याबाजूने ओव्हरटेक करने बेकायदेशीर आणि धोकादायक आहे. ओव्हरटेक करण्यापूर्वी नेहमी इंडिकेटरचा वापर करा. त्यामुळे मागच्या आणि पुढच्या वाहनाची मानसिकता समजून येण्यास मदत होईल.

वेग मर्यादेवर लक्ष द्या

ओव्हरटेक करताना वेग मर्यादेचं पालन करा. अत्यंत वेगाने ओव्हरटेक करणं धोकादायक ठरू शकतं. तसेच नो ओव्हरटेकिंगचे संकेत असतील किंवा तसे बोर्ड लागलेले असतील तर ओव्हरटेक करणं टाळा. हे संकेत नेहमी तीव्र वळण, पूल आदी धोकादायक ठिकाणी असतात.

सावध राहा

समोरच्या वाहनाला पूर्णपणे पास केल्यानंतर परत तुमच्या लेनमध्ये या. ओव्हरटेक करण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी जागा आहे हे सुनिश्चित करा. या नियमाचं पालन केलं नाही तर तुमच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो. तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. रस्त्यावरून वाहन चालवताना नेहमी सजग राहणं कधीही चांगलं. फोनवर बोलू नका. मोठ्या आवाजात गाणी लावून ऐकू नका. एखाद्या वाहनाला पुढे जाण्यासाठी जागा हवी असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर द्या. ताणतणाव आणि कडाक्याचं भांडण करून वाहने चालवू नका. वाहन चालवताना प्रसन्न मनस्थिती ठेवा. याशिवाय पुरेशी झोप झाली नसेल तर वाहन चालवणं टाळा.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.