इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याचा परिणाम, थेट विक्रीच घसरली

एप्रिलच्या तुलनेमध्ये मेमध्ये 39339 ईव्ही युनिट्‌सचे रजिस्ट्रेशन झाले असल्याची माहिती व्हेकल रजिस्ट्रेशन पोर्टल वाहनने शेअर केली आहे. दरम्यान आता फक्त रजिस्ट्रेशनच्या नोंदणीत घसरण झालेली दिसत आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याचा परिणाम, थेट विक्रीच घसरली
Electric vehicleImage Credit source: okinawascooters.com
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 3:07 PM

इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या (Electric vehicle) विक्रीमध्ये तब्बल 20 टक़्क्यांनी घट (20 percent reduction) झालेली आहे. एप्रिलच्या तुलनेमध्ये मेमध्ये 39339 ईव्ही युनिट्‌सचे रजिस्ट्रेशन नोंदविण्यात आले असल्याची माहिती व्हेकल रजिस्ट्रेशन पोर्टल वाहनने शेअर केली आहे. दरम्यान आता फक्त रजिस्ट्रेशनच्या नोंदणीत घसरण झालेली दिसत आहे. अनेक रिपोर्टसमध्ये असा दावा करण्यात आलाय, की आता फक्त एक महिन्याचे रजिस्ट्रेशनमध्ये ही घसरण आली आहे, परंतु यामुळे बाइक्सच्या लोकप्रियतेमध्ये कमी आल्याचे म्हटले जाउ शकत नाही. नुकतेच अनेक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या कारणामुळे (Fire incidents) लोकांमध्ये याचा नकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आहे. नुकत्याच अनेक दुचाकींना आग लागल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

मिंटने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलेय, की अनेक एक्सपर्टने मान्य केलेय, की बाइक्सच्या विक्रीत कमी येण्याचे अनेक कारणे असू शकतात. यातीलच एक सप्लाय चेन म्हणजेच पुरवठा साखळी हे कारण सांगण्यात आले आहे. कारण अनेक पार्ट्‌स आणि मटेरियल येण्याला वेळ लागत असतो. सोबतच दुसरे कारण ईव्हीच्या बॅटरीचे आहे. या बॅटर्यांना अनेक वेळा आगीचा सामना करावा लागला आहे. वारंवार लागत असलेल्या आगीच्या घटनेमुळे काही कंपन्यानी भविष्यासाठी काही खास स्टॅडर्ड बॅटरींची व्यवस्था केली आहे.

सुरक्षेचे अधिक महत्व

नुकतेच, इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीमध्ये आग लागण्याच्या कारणामुळे अनेक ग्राहकांनी सध्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा आपला प्लॅन थांबविला आहे. कंपन्याकडून टाकण्यात येत असलेल्या स्टॅडर्ड बॅटरींची वाट पाहिली जात आहे. नवीन बॅटरी एकप्रकारे फायरप्रूफ बॅटरीसह उपलब्ध होणार आहे. लवकरच सरकारदेखील या अनुशंगाने नवीन नियम लागू करु शकते, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट विकेश गुलाटी यांनी दिली आहे.

पुरवठा साखळीतही परिणाम

इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये दमदार मजबुती मिळविणारी कंपनी हिरो इलेक्ट्रिक देखील मेमध्ये पाचव्या स्थानावर पोहचली आहे. कंपनीला मेमध्ये केवळ 2849 युनिट्‌सचे रजिस्ट्रेशन मिळाले आहे. हिरो इलेक्ट्रिकच्या चीफ एग्झिकेटीव्ह सोहिंदर गिल यांनी सांगितले, की पुरवठा साखळीवर होत असलेल्या परिणामामुळे त्याच्या प्रोडक्शनमध्येही अडचणी निर्माण होत आहेत.

निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.