Volkswagen ची ढासू SUV लाँचिंगसाठी सज्ज, क्रेटा, सेल्टॉसला टक्कर
फॉक्सवॅगन Taigun 23 सप्टेंबरला भारतात अधिकृतपणे लॉन्च होईल. या महिन्याच्या सुरुवातीला Taigun साठी बुकिंग खुली झाली आहे.
मुंबई : फॉक्सवॅगन Taigun 23 सप्टेंबरला भारतात अधिकृतपणे लॉन्च होईल. या महिन्याच्या सुरुवातीला Taigun साठी बुकिंग खुली झाली आहे. ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आता ह्युंडई क्रेटा, किया सेल्टॉस, टाटा हॅरियर, एमजी हेक्टर प्लस सारख्या प्रस्थापित प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय, हे वाहन नुकत्याच लॉन्च झालेल्या स्कोडा कुशकला टक्कर देऊ शकते. (Volkswagen’s powerful SUV ready to launch in India in september, will compete with Creta and Seltos)
पुण्याजवळील चाकण येथील फॉक्सवॅगन प्लांटमध्ये तयार केली जात असल्याने Taigun ही कार जर्मन ब्रँडच्या इंडिया 2.0 धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर आधारित, Taigun ला एसयूव्ही म्हणून सादर केले जात आहे, जी फॉक्सवॅगन बिल्ड क्वालिटी मेन्टेन ठेवत भारतीय ग्राहकांसाठी तयार केली आहे.
Taigun दोन TSI पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. यात 1.0-लिटर TSI पेट्रोल मोटर आणि 1.5-लिटर पेट्रोल युनिट पर्यायदेखील असेल. लहान इंजिन मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध असेल आणि पर्याय म्हणून 6 स्पीड ऑटोमॅटिक युनिट मिळेल. मोठी 1.5-लिटर मोटर 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7 स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली असेल.
बाहेरील बाजूस, फॉक्सवॅगन एसयूव्हीला स्मार्ट फ्रंट ग्रिल, चारी बाजूने क्रोम डॉलप्स, 17-इंच अलॉय व्हील्स आणि स्ट्रेच-आउट एलईडी टेल लाइट स्कीमसारखे स्मार्ट डिझाइन एलिमेंट्स मिळतात. आतील बाजूस, कार वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, सनरूफ, 10 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, आठ-इंच ऑल-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
Taigun ही कार बोल्ड आणि डायनॅमिक आहे, जी भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते. फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले, “मल्टी-सिटी एक्सक्लुझिव्ह प्रीव्ह्यू म्हणून, आम्ही आमच्या ग्राहकांना नवीन Taigun चा अनुभव देऊ इच्छितो.
इतर बातम्या
अवघ्या 25 हजारात खरेदी करा जबरदस्त मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
अवघ्या 92 हजारात घरी न्या Maruti ची 31 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
महिंद्रा कडून Bolero Neo N10 (O) ची किंमत जाहीर, जाणून घ्या टॉप मॉडेलमध्ये काय आहे खास
(Volkswagen’s powerful SUV ready to launch in India in september, will compete with Creta and Seltos)