व्होल्ट्रॉन इलेक्ट्रिक सायकल सिंगल चार्जवर 75 किमी ते 100 किमी पर्यंत धावते आणि या सायकलचं टॉप टॉप स्पीड 25 किमी प्रतितास इतकं आहे. ही सायकल लिथियम फॉस्फेट बॅटरी, मिड-ड्राइव्ह मोटरसह सुसज्ज आहे आणि यावर एक पिलर रायडरदेखील अॅडजस्ट होऊ शकतो.
कंपनीचा दावा आहे की हिल रायडिंग, सिटी रायडिंग आणि ऑफ रोड रायडिंगसाठी ही सायकल उत्तम पर्याय आहे. या ई-बाईकची किंमत 40,000 रुपये इतकी आहे.
व्होल्ट्रॉन इलेक्ट्रिक सायकल पूर्ण चार्ज होण्यासाठी 700 वॅट वीज वापरते, जी 1 युनिटपेक्षा जास्त आहे आणि ही सायकल तीन तासात चार्ज होऊ शकते.
कंपनीचा दावा आहे की, ही सायकल पूर्ण चार्ज होण्यासाठी सरासरी 4 रुपये खर्च येतो. यामुळे छोट्या शहरांमध्ये या सायकलला मोठी मागणी आहे.
ई-बाईक सहजपणे स्थानिक पातळीवर दुरुस्त करता येते किंवा या सायकलचे भागही बदलता येतात. एका वर्षाच्या वॉरंटी कालावधीमध्ये कंट्रोलर आणि मोटरमध्ये समस्या आढळल्यास, कंपनी संपूर्ण सायकल बदलून देते.