कार घ्यायचीयं पण ग्राउंड क्लिअरन्सचं काय? अखेर प्रतीक्षा संपली!, जाणून घ्या ‘या’ पाच कारची माहिती…
अनेक जण नवी कार घेताना इंजीन, सेफ्टी, फिचर्स आदींबरोबरच कारच्या ग्राउंड क्लिअरन्सलाही खूप महत्व देत असतात. कारच्या खालच्या भागापासून ते जमिनीपर्यंतच्या अंतराला ‘ग्राउंउ क्लिअरन्स’ असे म्हटले जात असते. ज्या कार्सचा ग्राउंड क्लिअरन्स हा कमी असतो, त्या कारचा पृष्ठभाग हा रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर तसेच खड्ड्यांमुळे अधिक ओबडधोबड होत असतो.
मुंबई : भारतात मारुतीपासून ते टाटापर्यंत अनेक मोठ्या कारच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या विविध वाहनांना ग्राहकांकडूनही (customers) सर्वाधिक मागणी असते. ग्राहकांच्या आवडीनुसार, कंपन्या आपल्या कारच्या रचनेत अनेक बदलदेखील करीत असतात. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये कारप्रेमींच्या आवडीत अनेक बदल दिसून येत आहेत. आता नागरिक एसयूव्ही (SUV) पध्दतीच्या कारला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच लोक चांगल्या ग्राउंड क्लिअरन्सच्या (Ground clearance) कारलाही पसंती देत असल्याचे चित्र सध्या ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही कारची माहिती घेणार आहोत, ज्यांचा ग्राउंड क्लिअरन्स उत्तम आहे.
1) महिंद्रा अल्टुरस जी 4
महिंद्रा अल्टुरस जी 4 ही एक एसयूव्ही प्रकारातील कार आहे. या कारचा ग्राउंड क्लिअरन्स हा 244 एमएम इतका आहे. या कारची सुरुवातीची किंमत 28.77 लाख इतकी आहे. ज्यात बेस अल्टुरस उपलब्ध आहे. या कारमध्ये नापा लेदर, व्हेंटीलेटेड सीट्स, हिल स्टार्ट, डिसेंट कंट्रोल आदी विविध फिचर्स उपलब्ध आहेत. यासोबत ही कार 4 डब्ल्यू डी कफिग्रेशनसोबत देखील उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत 31.77 लाख इतकी आहे.
2) इसुझू डी-मॅक्स एमयू एक्स
भारतातील विविध कारमध्ये इसुझू डी-मॅक्सच्या कारलाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. या कारची किंमत 32.23 लाख रुपयांपासून ते 35.19 लाख रुपये इतकी आहे. ही कार 1.9 लीटर डिझेल इंजीनसह उपलब्ध आहे. त्यासोबतच 163 पीएसची क्षमता असून या कारचा ग्राउंड क्लिअरन्स हा 230 एमएम इतका आहे. या कारमध्ये 7 इंचाची इन्फोन्टमेंट सिस्टीमदेखील देण्यात आली आहे.
3) महिंद्रा थार
महिंद्रा थार ही महिंद्राची सर्वाधिक पसंत केली जाणारी जिप्सी कार आहे. या कारचा ग्राउंड क्लिअरन्स 226 एमएम इतका आहे. महिंद्राची ही एक लोकप्रिय ठरलेली रोड एसयुव्ही कार आहे. याची किंमत 12.78 लाख रुपयांपासून ते 15.08 लाखांपर्यंत आहे. या दोन्ही एक्स शोरुमच्या किंमती आहेत. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही स्वरुपामध्ये उपलब्ध आहे.
4) किआ सोनेट
किआ सोनेटचे नुकतेच नवीन व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. या नव्या कारचा ग्राउंड क्लिअरन्स 211 एमएम इतका आहे. या कारमध्ये के2 प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. या कारची स्पर्धा मारुती सुझुकीच्या विटारा ब्रेझा, ह्युंडाई व्हेन्यू, फोर्ड इको स्पोर्टस् आणि टाटा नेक्सॉन सोबत केली जात आहे.
5) टाटा नेक्सॉन
टाटा नेक्सॉन ही एक एसयुव्ही कार आहे. टाटाने ही कार तयार करण्यासाठी एक्स 1 प्लॅटफॉर्ममध्ये बदल केले आहेत. या कारचा ग्राउंड क्लिअरन्स 209 एमएम आहे. टाटाच्या या कारची किंमत जवळपास 8 लाख असून याच्या वरील व्हेरिएंटची किंमत 13.24 लाख रुपये इतकी आहे.
संबंधित बातम्या
वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर
Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती
3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स