इलेक्ट्रिक वाहनांच्या तेजीतून करायची कमाई, तर निफ्टी ऑटो ईटीएफमध्ये करा गुंतवणुकीची तयारी
देशातील सर्वात पहिला ऑटो ईटीएफ आज पासून गुंतवणूकीसाठी खुला होत आहे, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना थेट वाहन उद्योगात केवळ एक हजार रुपयांपासून गुंतवणुकीचा श्री गणेशा करता येणार आहे. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचे बुमिंग (booming) येण्याची शक्यता लक्षात घेत, गुंतवणुकदारांसाठी ही गुंतवणूक एक नामी संधी ठरु शकते.
मुंबई : कोरोना महामारीला धोबीपछाड देत देशातील अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने गती घेत आहे. अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक असलेल्या वाहन उद्योगाने ही मरगळ झटकली असून वाहन उद्योगाची घोडदौड सुरू झाली आहे. या उभारी घेणाऱ्या वातावरणात ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांसाठी पहिला निफ्टी ऑटो ईटीएफचा (Nifty Auto ETF) श्रीगणेशा केला आहे. इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगात हा फंड गुंतवणुकीचे लक्ष केंद्रित करणार आहे. आज पासून हा ईटीएफ गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. देशातील आघाडीचा म्युच्युअल फंड ICICI प्रुडेन्शियल या फंडची देखरेख करणार आहे. वाहन उद्योगातील निवडक कंपन्यांचा या फंड मध्ये समाविष्ट असून येत्या 10 जानेवारी 2022 रोजी हा ईटीएफ बंद होणार आहे. या ईटीएफ मध्ये वाहन उद्योगातील दहा मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे.
या प्रमुख कंपन्यात होईल गुंतवणूक पहिल्या ऑटो ईटीएफ मध्ये मारुती टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, आयशर मोटर्स यांचा समावेश आहे आजघडीला ऑटो सेक्टरमधील या आघाडीच्या कंपन्या आहेत. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने निफ्टी ऑटो ईटीएफ लार्ज कॅप ची कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा ईटीएफ इलेक्ट्रिक वाहन वर लक्ष केंद्रित करणार आहे. या ईटीएफ मध्ये मारुतीचा 19 टक्के, टाटा मोटर्सचा16. 78 टक्के , महिंद्रा अँड महिंद्राचा 16.32 टक्के, बजाज ऑटोचा 8.1 64 टक्के आणि आयशर मोटर्सचा 6.74 टक्के वाटा आहे. जगभरात वाहनांच्या संशोधन आणि विकासासाठी जवळपास 31 अब्ज डॉलर खर्च केले जातात. या संपूर्ण खर्चामध्ये भारताचा वाटा जवळपास 40 टक्के एवढा आहे. वाहन उद्योगात भारतीय बाजारपेठेत मारुतीची 50 टक्के हिस्सेदारी आहे. सध्या 2 लाख वाहने प्रतीक्षा यादीत आहेत.
वाहन उद्योग झेप घेणार कोरोना संकटातून भारतीय अर्थव्यवस्था बर्यापैकी सावरली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल उत्पादन प्रमुख चिंतन हरिया यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. अर्थव्यवस्थेत वाहन उद्योग मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. वाहनांचे सुटे भाग तयार करण्यात आपला देश आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मोबाईलिटी हळूहळू वाढीस लागलेली आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक सायकलमध्ये वाहन उद्योग एक महत्त्वाचे क्षेत्र असूनअशा या वृद्धिंगत होत जाणाऱ्या सेक्टर मध्ये गुंतवणूक करण्याची नामी संधी गुंतवणूकदारांना मिळत आहे.
ठळक मुद्दे निफ्टी ऑटो ईटीएफ पहिल्यांदा श्रीगणेशा केवळ हजार रुपयांपासून सुरू करता येणार गुंतवणूक हा ईटीएफ ओपन इंडेड असून तो निफ्टी ऑटो इंडेक्स ला ट्रॅक करेल खुल्या बाजारात वाहन उद्योगातील सॅड उतारांचा परिणाम यामध्ये दिसेल आज पासून ईटीएफ मध्ये करता येणार गुंतवणूक 10 जानेवारी रोजी हा एटीएम बंद होईल
इतर बातम्या
Digital Payment | भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 4 वर्षात 70 पटींनी वाढले डिजिटल पेमेंट!
Home Loan | होमलोन दुसऱ्या बँकेत स्विच करायचंय? केव्हा आणि कधी करावं? जाणून घ्या, फायदे!