RC Transfer Process : कार नावावर करायची! एजंटला पैसे देण्याची गरज नाही, अशा प्रकारे करा ऑनलाइन अर्ज
वापरलेली कार खरेदी करताना तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
मुंबई : कोणतंही वाहन खरेदी (Vehicle purchase) केलं की त्याला नावावर करायची पहिली आणि महत्वाची प्रक्रिया असते. यासाठी वेगवेगळे एजंट पैसेही मोठ्या प्रमाणात घेतात. त्यासाठी वेगवेगळे एजंटही असतात. वापरलेली कार खरेदी करताना तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तसेच, तुम्ही वाहन खरेदी करताच तुम्हाला ते हस्तांतरित (RC Transfer) करणे आवश्यक आहे. असे न केल्यास तेही गुन्ह्याच्या श्रेणीत येते. सहसा, एजंट वाहनाची मालकी हस्तांतरित करण्यासाठी मोठी रक्कम आकारतात. मात्र ऑनलाइन अर्ज (Apply online) सहज करता येतो. त्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्यानुसार तुम्ही हा अर्ज भरल्यास तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी सहज तो अर्ज भरू शकतात.
अर्ज कसा करावा –
कार किंवा बाईक हस्तांतरण मिळवण्यासाठी तुम्हाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाइटवर जावे लागेल (https://parivahan.gov.in/parivahan//en/content/vehicle-related-services) येथे तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल. राज्य निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक पृष्ठ उघडेल. येथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर तुम्हाला आता नोंदणी करा या पर्यायावर जावे लागेल.
नोंदणी कशी करावी-
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन सेवांमध्ये उपस्थित असलेल्या वाहन संबंधित सेवेवर जावे लागेल. वाहनाची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला फॉर्म 29 आणि 30 भरावा लागेल. दोन्ही फॉर्मवरील तपशील अतिशय काळजीपूर्वक भरा. कारण येथे जे तपशील भरले जातील, तेच तपशील आरसी बुकवरही दिसतील. दिल्लीतील कारचे आरसी ट्रान्सफर फी 500 रुपये आहे. सर्व तपशील भरल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय मिळेल. डेबिट कार्ड पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते.
हनाची कागदपत्रे आरटीओ कार्यालयात-
पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात पाठवावी लागतील. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुमचे वाहन सहज हस्तांतरित केले जाईल. एकदा वाहन हस्तांतरित केल्यानंतर, फक्त 7 दिवसात आरसी तुमच्या घरी येईल. जर तो आला नाही तर तुमच्या फोनवरही यासंबंधीचा मेसेज येईल. न आल्यास जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन माहिती घ्यावी लागेल. तिथेही आरसी न मिळाल्यास लगेच आरटीओ कार्यालयाला कळवावे लागते. एजंट वाहनाची मालकी हस्तांतरित करण्यासाठी मोठी रक्कम आकारतात. मात्र ऑनलाइन अर्ज सहज करता येतो. त्यासाठी तुम्हाला अगदी सोप्या काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्यानुसार तुम्ही हा अर्ज भरल्यास तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी सहज तो अर्ज भरू शकतात.