एका कारच्या दोन व्हेरियंटमध्ये काय असतो फरक? जाणून घ्या कशी वाढते किंमत

Auto Car Tips: कंपनी आपल्या मॉडेल्सचे वेगवेगळे व्हेरियंट सादर करते. प्रत्येक व्हेरियंटची किंमत ही एकापेक्षा वेगळी असते. त्यामुळे ऐनवेळी आपण संभ्रमात पडतो. पण या मागे नेमकं काय कारण असतं जाणून घेऊयात

एका कारच्या दोन व्हेरियंटमध्ये काय असतो फरक? जाणून घ्या कशी वाढते किंमत
एका कारच्या दोन व्हेरियंट नेमकं असं काय असतं की किंमत वाढते, जाणून घ्या Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 7:46 PM

मुंबई : ऑटो कंपन्यांच्या एकापेक्षा एक सरस अशा गाड्या बाजारात दाखल होत असतात. कारप्रेमींना याबाबत सर्वकाही माहिती असतं. पण सामान्य ग्राहक ज्याला पहिल्यांदा गाडी घ्यायची तो मात्र कारच्या विविध व्हेरियंटबाबत संभ्रामात पडतो. गाडीचं मॉडेल तर सेम आहे, मग दुसऱ्या व्हेरियंटची किंमत जास्त असण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.कारण तु्म्ही तुमचं बजेट गाडी खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी ठरवलेलं असतं. त्यानंतर शोरूममध्ये गेल्यावर आपल्या वेगवेगळे व्हेरियंट दाखवले जातात. त्यापैकी एक निवडण्यास सांगितलं जातं. बेस व्हेरियंट आणि टॉप व्हेरियंट इतकं कळतं पण नेमकं काय असतं ते जाणून घेऊयात.

कंपनी आपल्या मॉडेलच्या अनेक गाड्या सादर करत असते. बेस व्हेरियंटची किंमत समजा 14 लाख रुपये असेल. तर टॉप व्हेरियंटची किंमत 20 ते 22 लाखापर्यंत जाते. कारण असतं ते दोन्ही गाड्यांमध्ये दिलं जाणाऱ्या फीचर्सचं. जर तुम्ही एखाद्या गाडीचं बेस मॉडेल विकत घेतलं तर त्यात म्युझिक सिस्टम, पॉवर विंडो, रियर डिफॉगर, ऑटोमेटिक ट्रान्समिशन, क्रूझ कंट्रोल, एअरबॅग्स, एलईडी लाईट्स, अलॉय व्हील्स, रेन सेंसिंग वायपर, एडीएएससारखे फीचर्स मिळत नाहीत. दुसरीकडे टॉप व्हेरियंटमध्ये हे सर्व फीचर्स असतात. त्यामुळे टॉप व्हेरियंटची किंमत वाढते.

काही टॉप मॉडेल मर्यादित स्वरुपात लाँच केले जातात.कंपनी टॉप व्हेरियंट मॉडेलमध्ये काही खास असं देते.त्यामुळे त्याचं आकर्षण वाढतं. खासकरुन लग्झरी फीचर्स दिले जातात. उदाहरणार्थ, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, व्हेंटिलेटेड सीट्स, कंपनी फिटेड अलॉय व्हील्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, रियर डिफॉगर, पॅनारमिक सनरुफ, क्रुझ कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, टर्बो इंजिन सारखे फीचर्स देते.

जेव्हा एखादी कंपनी एखादी गाडी लाँच करते तेव्हा अनेक व्हेरियंटही सादर करते. त्यामुळे एखाद्या व्हेरियंटची मागणी वाढली की प्रतीक्षा यादी वाढते.या संधीचा फायदा घेत कंपनी टॉप व्हेरियंट देण्यास पसंती देते. कारण गाडीतील चेसिस आणि आकार वगैरे सारखंच असतं. फक्त फीचर्स आणखी दिले की, फायदा होण्याची शक्यता असते.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....