Green Hydrogen म्हणजे काय, धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या इंधनावर कार कशी धावते?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) नुकतेच हायड्रोजन आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (Fuel Cell Electric Vehicle- FCEV) मध्ये बसून संसद भवनात पोहोचले.

Green Hydrogen म्हणजे काय, धुराऐवजी पाणी सोडणाऱ्या इंधनावर कार कशी धावते?
Nitin GadkariImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:55 PM

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) नुकतेच हायड्रोजन आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (Fuel Cell Electric Vehicle- FCEV) मध्ये बसून संसद भवनात पोहोचले. ही घटना चर्चेचा विषय बनली होती. कारण, गडकरी ज्या कारमधून ते आले होते ती कार पेट्रोल किंवा डिझेलवर चालत नाही, तर ग्रीन हायड्रोजनवर (Green Hydrogen) चालते. केंद्रीय मंत्र्यांनी ‘ग्रीन हायड्रोजन’वर वर चालणाऱ्या कारचे प्रदर्शन केले आणि देशातील हायड्रोजन आधारित प्रणालीला समर्थन देण्यासाठी हायड्रोजन, एफसीईव्ही तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे याबद्दल जागरूकता पसरवण्याच्या गरजेवर भर दिला. इलेक्ट्रिक वाहनांपाठोपाठ आता ग्रीन हायड्रोजन वाहनांचीही जोरदार चर्चा आहे.

येणारा काळ हा या वाहनांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांसाठीही हे इंधन किफायतशीर ठरेल आणि त्यामुळे प्रदूषणही होणार नाही. आता प्रश्न असा आहे की हा ग्रीन हायड्रोजन काय आहे? या इंधनावरसुद्धा कार पेट्रोल-डिझेलसारखी कशी चालते? पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून धूर निघतो, मग ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार काय उत्सर्जित करते?

ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?

ग्रीन हायड्रोजन हा ऊर्जेचा स्वच्छ स्रोत आहे. ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे केले जातात. या प्रक्रियेत इलेक्ट्रोलायझरचा वापर केला जातो. इलेक्ट्रोलायझर अक्षय ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) वापरते. यामध्ये सौर आणि पवन ऊर्जा (सोलार आणि विंड) या दोन्हींचा समावेश आहे. हायड्रोजनचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. यामध्ये रसायने (केमिकल), लोह, पोलाद, वाहतूक, हीटिंग आणि वीज यांचा समावेश आहे. हायड्रोजनच्या वापरामुळे प्रदूषणही पसरत नाही.

ग्रीन हायड्रोजन कसे काम करते?

हायड्रोजन कार थोड्या वेगळ्या असतात. अशा वाहनांमध्ये दोन हायड्रोजन टँक असतात, ज्यामध्ये एक हायली कंप्रेस्ड आणि दुसरा लो कम्प्रेस्ड असतो. हायड्रोजन वायू हा अतिशय ज्वलनशील आहे, त्यामुळे त्याची टाकी आणि तो वाहून नेणारा पाइप मजबूत असणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत, या प्रक्रियेत एका चेम्परचा वापर केला जातो. ज्यामध्ये एका बाजूने ऑक्सिजन आणि दुसऱ्या बाजूने हायड्रोजन पाठवला जातो. दोघांमधील रासायनिक अभिक्रियामुळे एक ऊर्जा निर्माण होते. जी कार चालण्यास मदत करते. यामध्ये धुराऐवजी H2O बाहेर पडतो. त्यामुळे प्रदूषणही पसरत नाही.

‘ग्रीन हायड्रोजन’ मध्ये लोकांचं वाढतं स्वारस्य

गेल्या काही वर्षांपासून जगातील बड्या तेल आणि वायू कंपन्यांचाही ‘ग्रीन हायड्रोजन’मध्ये रस वाढला आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, वीज प्रत्येक गोष्टीसाठी वापरता येत नाही. अशा परिस्थितीत, गॅस काही औद्योगिक प्रक्रिया आणि अवजड वाहतुकीसाठी वापरला जाऊ शकतो. तसेच रिन्यूएबल हायड्रोजन हा सर्वोत्तम वायू आहे. हे इंधन पूर्णपणे स्वच्छ आहे. ‘रिन्यूएबल एनर्जी’चा खर्च कमी झाल्याने ‘ग्रीन हायड्रोजन’चा उत्पादन खर्चही कमी होत आहे.

भारत लवकरच ग्रीन हायड्रोजन निर्यात करणारा देश बनणार

सरकारचं म्हणणं आहे की, हायड्रोजनवर चालणारी फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल शून्य कार्बन उत्सर्जनासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हे वाहन पूर्णपणे इको-फ्रेंडली आहे ज्यामध्ये पाण्याशिवाय इतर कोणत्याही पदार्थाचे उत्सर्जन होत नाही. ग्रीन हायड्रोजन अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून तयार केला जाऊ शकतो.

गडकरींच्या ग्रीन हायड्रोजन कारची चर्चा

तीन दिवसांपूर्वी ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या कारमधून नितीन गडकरी संसदेत पोहोचले. टोयोटा मिराई (2022 Toyota Mirai) असे या कारचे नाव आहे. टोयोटाने त्यांच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही कार तयार केली असून त्यात अत्याधुनिक इंधन सेल यंत्रणा म्हणजेच अॅडव्हान्स फ्यूल सिस्टिम बसवली आहे. ही सिस्टम सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे मिश्रण करून एका विशेष उर्जा प्रक्रियेद्वारे निर्माण करुन त्याचे वीजेत रुपांतर करते. या विजेच्या साहाय्याने गाडी धावते. टोयोटाने नुकतीच आपली हायड्रोजन कार टोयोटा मिराई भारतात लाँच केली आहे. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच ही कार सादर करण्यात आली. गडकरींनी ही कार भारताचं भविष्य आहेस, असं वर्णन केलं असून जपानी भाषेत मिराई या शब्दाचा अर्थदेखील भविष्य असा होतो.

कशी आहे मिराई कार?

टोयोटाच्या मिराई कारमध्ये एक विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात हायड्रोजन फ्यूल टँक आहे. यामधून हायड्रोजन बाहेर येऊन फ्यूल सेलमध्ये जातो. ऑक्सिजनच्या मदतीने केमिकल रिअॅक्शन होते, त्यानंतर वीज तयार होते. हायड्रोजन फ्युएल सेलच्या साहाय्याने निर्माण होणाऱ्या विजेमुळे यामधील मोटारीला पॉवर मिळते आणि मिराई कार धावू लागते.

इतर बातम्या

कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी, नितीन गडकरींनी जारी केलेले नियम लागू होणार

भारतात 1 एप्रिलपासून सर्व BMW कार महागणार, पाहा किती होणार दरवाढ

नवीन कलर थीम आणि स्पोर्टी लूकसह 2022 Yamaha YZF-R3 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.