तुम्हीपण Tesla ची वाट पाहताय? एलॉन मस्कने सांगितलं उशीर होण्याचं कारण
भारतात टेस्ला इलेक्ट्रिक कारची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, दरम्यान, कंपनीचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत गणले जाणारे एलॉन मस्क यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे की, भारतात कार लॉन्च होण्यास उशीर का होतोय?
मुंबई : भारतात टेस्ला इलेक्ट्रिक कारची (Tesla Electric car) लोक आतुरतेने वाट पाहत आहेत, दरम्यान, कंपनीचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत गणले जाणारे एलॉन मस्क यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे की, भारतात कार लॉन्च होण्यास उशीर का होतोय? एलॉन मस्क म्हणतात की भारतात कार लॉन्च करताना त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यावर मात करण्यासाठी ते भारत सरकारसोबत काम करत आहेत.
टेस्ला कंपनी आपली कार भारतात लॉन्च करण्याचा विचार करत आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवरील एका युजरने मस्क यांना विचारले होते की टेस्ला भारतात लॉन्च करण्यासंदर्भात काही अपडेट आहे का? कंपनीच्या कार उत्तम आहेत आणि त्या जगाच्या कानाकोपऱ्यात असाव्यात. या ट्विटला उत्तर देताना मस्क म्हणाले की, यामध्ये अनेक आव्हाने आहेत आणि आम्ही सरकारसोबत मिळून काम करत आहोत.
टेस्ला यावर्षी भारतात आयात केलेल्या कारची विक्री करण्याचा विचार करत आहे, परंतु भारतातील करांचे (टॅक्स) दर जगात सर्वात जास्त असल्याचे टेस्लाचे म्हणणे. त्यामुळे टेस्लाने सरकारला इलेक्ट्रिक वाहनांचे आयात शुल्क कमी करण्यास सांगितले होते. परंतु अनेक देशांतर्गत ब्रँड्सनी याला विरोध केला, कारण त्यांचे असे म्हणणे होते की, सरकारने असे पाऊल उचलल्यास त्याचा देशांतर्गत उत्पादनातील गुंतवणुकीवर परिणाम होईल.
टेस्लाची 7 इलेक्ट्रिक वाहनं भारतात लाँच होणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्तापर्यंत टेस्लाच्या 7 इलेक्ट्रिक वाहनांना भारतात लॉन्च करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. यामध्ये सर्वात लोकप्रिय टेस्ला मॉडेल 3 भारतात सर्वात आधी दाखल होईल, असे सांगितले जात आहे.
टेस्ला मॉडेल 3 ही अमेरिकेतील एंट्री-लेव्हल कार आहे आणि ती भारतातील टेस्लाची पहिली इलेक्ट्रिक कार असू शकते. ही टेस्ला कार भारतात दोन प्रकारात सादर केली जाऊ शकते. ही कार सिंगल चार्जवर 423 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते, तर दुसरं व्हेरिएंट सिंगल चार्जवर 568 किमी अंतर कापू शकतं. ही कार फक्त 4.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
इतर बातम्या
1.58 लाखांची बजाज Bajaj Pulsar अवघ्या 50 हजारात, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
बहुप्रतीक्षित Simple One Electric Scooter च्या वितरणाची तारीख ठरली, कंपनीला 30000 हून अधिक ऑर्डर्स
सिंगल चार्जमध्ये 250KM रेंज, इलेक्ट्रिक क्रूझर बाईक या महिन्यात बाजारात