AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारचे रिव्हर्स लाईट पांढऱ्या रंगाचेच का असतात? तुम्हाला माहिती आहे का याचे नेमके कारण

आजही कार निर्माते कारमध्ये असे काही फीचर्स देतात, सुरवातीच्या काळापासून ते आजपर्यंत कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहोत.

कारचे रिव्हर्स लाईट पांढऱ्या रंगाचेच का असतात? तुम्हाला माहिती आहे का याचे नेमके कारण
रिव्हर्स लाईटImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 8:49 PM

मुंबई : सध्या कार चैनीची नाही तर गरजेची वस्तू झाली आहे.  काही वर्षांपूर्वी कार उत्पादक मूलभूत वैशिष्ट्यांसह कार लॉन्च करायचे, आता नवीन आणि आधुनिक कारमध्ये अत्याधुनीक आणि अतिशय नवीनतम वैशिष्ट्ये वापरल्या जात आहेत. कारमध्ये काही फीचर्स लक्झरीसाठी दिले जातात, तर काही सुरक्षा लक्षात घेऊन दिले जातात. पण आजही कार निर्माते कारमध्ये असे काही फीचर्स देतात, सुरवातीच्या काळापासून ते आजपर्यंत कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहोत. आपण ज्या वैशिष्ट्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे रिव्हर्स लाइट (Importance of reverse light)  किंवा बॅकअप लाइट, जो कारच्या मागे पांढरा रंगांचा असतो. तुम्ही सर्वांनीच गाड्यांमध्ये लावलेला हा लाईट पाहिला असेलच.

पण प्रश्न असा पडतो की जे फिचर जुन्या गाड्यांमध्ये वापरले जात होते, ते आजच्या काळात आधुनिक कारमध्ये ही कुठलाच बदल नकरता का वापरले जात आहे. हा रिव्हर्स लाइट किंवा बॅकअप लाइट काय आहे आणि त्याचा खरा उपयोग काय आहे? हे जाणून घेऊया.

रिव्हर्स लाईटचे मुख्य काम

रिव्हर्स लाइटचे कोणतेही विशेष काम नाही असे अनेकांना वाटत असले तरी प्रत्यक्षात हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जर तुम्ही ड्रायव्हर असाल तर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही रिव्हर्स गियर लावल्यावर रिव्हर्स लाइट/बॅकअप लाईट चालू होते.

हे सुद्धा वाचा

हे मागून येणाऱ्या वाहनांना सूचित करते की तुम्ही तुमची कार मागे घेत आहात. हॅझार्ड लाइट प्रमाणे, रिव्‍हर्स लाइट देखील इतर वाहनांना सिग्नलच्‍या स्‍वरूपात असते, जे सहसा मोठे अपघात टाळू शकतात.

उदाहरणार्थ, समजा तुमच्या मागे असलेल्या वाहनाला तुम्ही तुमची कार मागे घेणार आहात हे माहीत नसेल आणि ते तुमच्या दिशेने जात असेल तर मोठा अपघात होऊ शकतो. मात्र या लाईटमुळे मागच्या वाहानाला गाडी मागे येणार असल्याचे कळते.  एवढेच नाही तर रिव्हर्स लाइट आणखी एक उद्देश पूर्ण करतो. अंधारात  तुमच्‍या वाहनाला रिव्हर्स घेण्यासाठी प्रकाशाची गरज असते जेणेकरुन तुम्‍ही योग्य पद्धतीने गाडी मागे घेऊ शकता.

ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी हा लाईट तुम्हाला वाहन कुठे आणि किती रिव्हर्स करायचे हे समजण्यासाठी पुरेसा प्रकाश पुरवतो. रिव्हर्स कॅमेरा असलेल्या कारमध्येही हा रिव्हर्स लाइट उपयुक्त आहे.

ज्या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरे बसवलेले असतात, तिथे रिव्हर्स लाइट रात्री पुरेसा प्रकाश पुरवतो. याद्वारे, मागे वळून पाहण्याऐवजी, आपण आपल्या स्क्रीनकडे पाहून आपल्याला किती रिव्हर्स करावे आणि वाहन कधी थांबवावे हे समजू शकते.

एकूण सुरक्षिततेच्या दृष्टीने रिव्हर्स लाइट हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तुमचे हेड लॅम्प, हेडलाइट्स आणि टर्न इंडिकेटर याप्रमाणे तुमचे बॅकअप/रिव्हर्स लाइट नेहमी कार्यरत ठेवायला हवे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.