उन्हाळ्यात का लागते वाहनांना आग? काय आहेत उपाय
वाहनांना उन्हाळ्यात आग लागण्याच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. उन्हाळा सुरु होताच कार, दुचाकी, तीनचाकींना आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामागे काय कारण आहे. त्यापेक्षा या घटना घडू नये यासाठी ही कारणं उपयोगी ठरतील. त्यावरील उपाय जाणून घेऊयात..
सूर्य तळपू लागला आहे. सूर्याने ओग ओकायला सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्यात अनेक ठिकाणी वाहनांना आग लागण्याच्या घटना घडल्या. अनेक शहरात दुचाकी, चारचाकी, तीनचाकींना आग लागण्याच्या घटना आपण बातम्यांतून पाहतो. काही घटना तर आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या असतात. या वाहनांना वाचविण्याचे प्रयत्न पण निष्फळ ठरतात. कारण तळपत्या उन्हात त्यांची लवकरच राखरांगोळी होते. उन्हाळ्यातच वाहनांना आग का लागते हा मोठा प्रश्न आहे. त्यामागचे कारण तरी काय, ही कारणं शोधल्यावर तुम्हाला त्यावरील उपाय पण लागलीच सापडेल.
उन्हाळ्यातच वाहनं का भक्ष्यस्थानी ?
उन्हाळ्यात अनेकदा इलेक्ट्रिक कारला आग लागण्याच्या घटना अशात तुम्ही ऐकल्या असतील. बातम्यातून पाहिले असेल. उष्णतेमुळे या दुचाकी, चारचाकी वाहनातील बॅटरीचे तापमान वाढते. त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. आता तर पेट्रोल आणि डिझेल कारमध्ये पण आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. अर्थात त्यामागील कारणं थोडी वेगळी आहेत. ती जाणून घेऊयात..
- बॅटरीवरील ताण वाढणे : अनेकदा असे समोर आले आहे की, कार मालक, कारच्या क्षमतेपेक्षा अधिकचा म्युझिक प्लेअर बसवितात. तर अनेक लोक वाहनात जादा दिवे बसवतात. त्यामुळे वाहनांच्या बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो. शॉर्ट सर्किटला हे निमित्त होते आणि कार, दुचाकी, वाहन पेट घेते.
- वायरिंगमधील बिघाड : वाहनात मागे-पुढे असलेल्या दिव्यांसाठी अनेक विद्युत तारांचे कोंडाळे असते. या वायरिंग वाहनात मागे पुढे असतात. या वायर उंदिराने कुरतडल्या अथवा काही कारणाने वायर खराब झाल्यास शॉर्ट सर्किट होण्याची भीती असते. त्यामुळे आग लागण्याची भीती असते.
- पेट्रोल-डिझेल टँकमध्ये लिकेज : पेट्रोल आणि डिझेल टँकमध्ये अनेकदा लिकेज होतो. या कारणामुळे वाहनाच्या अनेक भागात पेट्रोल-डिझेल पाझरते. त्यात शॉर्टसर्किट झाल्यास, उष्णतेने आग लागण्याची भीती असते. त्यामुळे वाहनांची वेळोवेळी निगा ठेवणे आणि सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे.
काय आहेत उपाय
आगीपासून वाचण्यासाठी वाहनाची देखाभाल करणे महत्वाचे आहे. नियमितपणे सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. वेळोवेळी कारची वायरिंग तपासणे, एलपीजी गॅसवर चालणारी वाहनांची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही कडक उन्हात कार उभी करत असाल तर या कारच्या खिडक्या किंचित खाली करणे आवश्यक आहे. त्यामुळे कारमध्ये हवा खेळती राहील. कार चालवतान मीटरवर लक्ष ठेवावे. वाहनांचे तापमान तपासणे आवश्यक आहे.