सफेद, पिवळा, हिरवा, लाल… गाड्यांच्या रंगीबेरंगी नंबर प्लेटचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
भारतातील गाड्यांसाठी जवळपास सहा रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. यात पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, काळा आणि निळा रंगाच्या नंबर प्लेटचा समावेश होतो. (Why Indian Vehicles Have Different Colour Number Plates)
मुंबई : तुमच्या घरात कार आहे का? त्या गाडीच्या नंबर प्लेटचा रंग काय? पांढरा, पिवळा की हिरवा….कदाचित तुमच्या कारची नंबर प्लेट पांढरी असेल. पण ती पांढरी असण्यामागचे नेमकं कारण तुम्हाला माहिती आहे का? नाही ना… भारतातील गाड्यांसाठी जवळपास सहा रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. यात पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, काळा आणि निळा रंगाच्या नंबर प्लेटचा समावेश होतो. या सर्व रंगीत नंबर प्लेटचे असण्यामागे एक विशेष कारण लपलेले आहे. (Why Indian Vehicles Have Different Colour Number Plates)
अनेक वाहतूक पोलिसांना या नंबर प्लेटच्या रंगावरुन ते वाहन कोणत्या श्रेणीतील आहे? ते खासगी आहे की व्यावसायिक याची सर्व माहिती मिळते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एका नंबर प्लेटच्या रंगावरुन एवढी माहिती कशी काय मिळू शकते? याचे रहस्य नंबर प्लेटच्या विविध रंगात दडलेले आहे. चला ते जाणून घेऊया….
⚪सफेद/पांढरा रंगाची नंबर प्लेट
सफेद किंवा पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ खासगी वाहनांसाठी दिली जाते. जर तुमच्या घरी एखादी मोटारसायकल किंवा कार असेल तर त्याची नंबर प्लेट बहुतांश वेळी पांढऱ्या रंगाची असते.
?पिवळ्या रंगाची नंबर प्लेट
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ सार्वजनिक आणि व्यावसायिकपणे वापरल्या जाणाऱ्या वाहनांना दिली जाते. म्हणजेच बस, टॅक्सी, कॅब, ऑटो रिक्षा यासारख्या सार्वजनिक वाहनांवर पिवळ्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते. त्यासोबतच व्यावसायिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असते. यात ट्रेलर, ट्रक, मिनी ट्रक यासारखे माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांकडे व्यावसायिक वाहनचालकाचा परवाना असणे आवश्यक आहे.
?लाल नंबर प्लेट
लाल रंगाची नंबर प्लेट ही फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या गाड्यांसाठी राखीव ठेवलेली असते. या नंबर प्लेटमध्ये क्रमांकाऐवजी अशोक चक्र असते. याशिवाय लाल रंगाची नंबर प्लेट ही एखाद्या कार निर्माती कंपनी चाचणी किंवा प्रमोशनसाठी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांवरही असते. या वाहनांना त्यावेळी तात्पुरता नंबर दिला जातो. (Why Indian Vehicles Have Different Colour Number Plates)
?हिरव्या रंगाची नंबर प्लेट
गेल्या काही दिवसांपासून भारतात हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या गाड्या सर्रास पाहायला मिळत आहे. हिरव्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ इलेक्ट्रिक वाहनांवर लावली जाते. हिरव्या रंगाचे नंबर प्लेट ही खासगी आणि व्यावसायिक वाहनांवर लावली जाते. पण या नंबर प्लेटवरील अंक हे त्या त्या वर्गवारीनुसार लावले जातात. म्हणजे जर एखादे इलेक्ट्रीक वाहन हे खासगी असेल, तर त्यावरील अंक हे पांढरे असतात. तर जी कारही व्यावसायिक असेल त्यावरील अंक हे पिवळ्या रंगाचे असतात.
?निळ्या रंगाची नंबर प्लेट
परदेशी प्रतिनिधींसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर निळ्या रंगाची नंबर प्लेट वापरली जातात. या गाडीतून केवळ परदेशी राजदूत प्रवास करु शकतात.
⚫काळ्या रंगाची नंबर प्लेट
काळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ भाड्याने दिलेल्या व्यावसायिक वाहनांवर पाहायला मिळते. अनेक भाड्याच्या कारवर काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. ज्यावर पिवळ्या रंगात क्रमांक लिहिला जातो. (Why Indian Vehicles Have Different Colour Number Plates)
संबंधित बातम्या :
उन्हाळ्यात काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे का वापरु नये? जाणून घ्या Interesting कारण
भारतीय रेल्वेतील जंक्शन, टर्मिनल आणि सेंट्रल या शब्दांचा अर्थ काय? जाणून घ्या