भारतात पांढऱ्या रंगाच्या कारला का आहे सर्वाधीक मागणी? तुम्हाला माहित आहे का यामागचे कारण?

नुकताच एक अहवाल आला होता ज्यामध्ये 2022 साली 43 टक्के भारतीयांनी पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली होती.

भारतात पांढऱ्या रंगाच्या कारला का आहे सर्वाधीक मागणी? तुम्हाला माहित आहे का यामागचे कारण?
पांढऱ्या कारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 9:18 PM

मुंबई : सहसा लोकं जेव्हा कार खरेदी करायला जातात तेव्हा सर्वप्रथम कोणत्या रंगाची गाडी घ्यायची, कोणता रंग स्टाईलिश तसेच आकर्षक दिसेल याचा विचार करतात. नुकताच एक अहवाल आला होता ज्यामध्ये 2022 साली 43 टक्के भारतीयांनी पांढऱ्या रंगाची कार (White Car) खरेदी केली होती. अशा परिस्थितीत आता प्रश्न पडतो की लोकांना पांढऱ्या रंगाची कार सर्वाधिक का आवडली?

या रंगाच्या वाहनांना आहे सर्वाधीक पसंती

अभ्यासानुसार पांढऱ्या व्यतिरिक्त लोकांना सर्वात जास्त आवडलेला रंग राखाडी म्हणजेच ग्रे आहे. हा रंग हलका असल्याने आणि सुंदर दिसत असल्याने लोकांना ते अधिक आवडतात. याशिवाय भारतीयांना सिल्व्हर कलरची कारही खूप आवडली. सुमारे 15-15 टक्के ग्राहकांनी या रंगांच्या कार खरेदी केल्या.

इतर लोकप्रिय कारमध्ये लाल रंगाची कार 9 टक्के, निळ्या रंगाची कार 7 टक्के, तर काळ्या रंगाची कार केवळ 3 टक्के लोकांनी खरेदी केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात पांढऱ्या रंगाची छोटी वाहने सर्वाधिक खरेदी केली जातात. याचे पांढऱ्या रंगाची वाहने भारतात सर्वाधिक विकली जातात कारण येथील हवामान खूप उष्ण आहे आणि पांढरी वाहने सहजासहजी गरम होत नाहीत. गाडी धुतल्यावर स्वच्छ चकाचक अशी एकाच रंगाची गाडी पाहायला मिळते .ती म्हणजे पांढऱ्या. स्वच्छतेचे प्रतिक असल्याने पसंतीस पडत असावी.

हे सुद्धा वाचा

रिसेल किंमत

इतर रंगांच्या तुलनेत पांढऱ्या रंगाच्या वाहनांना रिसेल किंमत जास्त असते. या कारणामुळे अनेकजण पांढऱ्या रंगाची कार घेण्याला प्राधान्य देतात. याशिवाय पांढऱ्या रंगावर रेघोट्या उठून दिसत नाही. तसेच पेंटला टच अप करण्याचा खर्चसुद्धा कमी येतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.