नवीन TVS Radeon लाँच, हिरोच्या स्प्लेंडर XTEC सोबत होणार सरळ स्पर्धा

ए अपडेट्स आणि अनेक खास फीचर्ससह (Features) टीव्हीएसने आपली बाईक TVS Radeon ला नवीन अपडेटसह लाँच केले आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून या बाइकला अधिक पसंत केले जात आहे. ऑटो सेक्टरशी निगडीत लोकांच्या म्हणण्यानुसार, या बाइकची सरळ स्पर्धा (Competition) हिरोच्या काही काळापूर्वीच लाँच झालेल्या स्प्लेंडर XTEC सोबत होणार […]

नवीन TVS Radeon लाँच, हिरोच्या स्प्लेंडर XTEC सोबत होणार सरळ स्पर्धा
tvs RadsonImage Credit source: tvsmotor.com
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 3:33 PM

ए अपडेट्स आणि अनेक खास फीचर्ससह (Features) टीव्हीएसने आपली बाईक TVS Radeon ला नवीन अपडेटसह लाँच केले आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून या बाइकला अधिक पसंत केले जात आहे. ऑटो सेक्टरशी निगडीत लोकांच्या म्हणण्यानुसार, या बाइकची सरळ स्पर्धा (Competition) हिरोच्या काही काळापूर्वीच लाँच झालेल्या स्प्लेंडर XTEC सोबत होणार आहे. TVS Radeon मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. यात युएसपी फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. या शिवाय प्रीमिअम स्टाइलिंग एलईडी डीआरएल (LED DRL), फंकी स्पीडोमीटर बेस्ट ग्राउंड क्लीयरेंस आणि व्हीलवेस, युएसबी चार्जिंग पेार्टसह यात साइड स्टँड इंडीकेटर बीपिंग देण्यात आले आहे. स्प्लेंडर प्लस XTEC च्या लाँचिंगनंतर टीव्हीएसने Radeon मध्ये अनेक आधुनिक बदल केले आहेत.

Splendor + XTEC फीचर्स

हिरो मोटोकॉर्पच्या या सेगमेंटमधील ही सर्वाधिक अत्याधुनिक बाइक आहे. यात डिजिटल मीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एसएमएस आणि कॉल अलर्ट, बॅटरी लेव्हर एंडीकेटर आणि रियल टाइम मायलेज इंडीकेटर सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. सेफ्टीबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीने या बाइकमध्येही साइड स्टँड इंडीकेटर दिले आहेत. जर बाईक पडली तरी तिचे इंजिन ऑटोमॅटीक बंद होण्याचे फीचरदेखील यात देण्यात आले आहे.

TVS Radeon चे फीचर्स

Splendor + XTEC च्या स्पर्धेत टीकून राहण्यासाठी TVS Radeon च्या टेक्नॉलॉजीमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आल आहे. त्यानुसार, बाइकमध्ये क्लास लीडिंग रिव्हर्स एलसीडी क्लस्टर देण्यात आले आहे. हे एलसीडी क्लस्टर रियल टाइम माइलेंस इंडीकेटर RTMi फीचरसह उपलब्ध होणार आहे. या शिवाय यात डिजिटल क्लस्टरमध्ये 17 फीचर्स देण्यात आले आहेत. यात क्लाक, सर्व्हिस इंडीकेटर आदींचा समावेश आहे.

दरम्यान, असा अंदाज लावण्यात येत होता, की टीव्हीएस नवीन Radeon SmartXonnect टेक्नॉलॉजीसह येईल, परंतु असे झाले नाही. ही सुविधा सध्या टीव्हीएस स्कूटर्स Jupiter Grande, Ntorq आणि मोटरसायकल Apache RTR200 4V आणि RR310 आदींमध्ये उपलब्ध आहे. या माध्यमातून युजर्सना एसएमएस अलर्ट, सर्व्हिस अलर्ट आणि नेविगेशन असिस्टेंट सारख्या सुविधा मिळणार आहेत.

दमदार परफॉर्मेंस

नवीन Radeon च्या फीचर्समध्ये चांगली वाढ करण्यात आली आहे. या शिवाय, परफॉर्मेंसच्या बाबतीतही ही बाइक दमदार आहे. बाइकचे इंजिन 109.7 सीसीचे असून ते 8.08 bhp of Max power जनरेट करते. याचे मायलेज 69kmpl इतके आहे. जर Splendor + XTEC बरोबर तुलना केली तर, या बाइकचे इंजिन 97.2 lhlh क्षमतेचे आहे. यातून 7.9 bhp ची पावर जनरेट होते.

काय असेल किंमत?

TVS Radeo 110 ES BSVI ची किेंमत 59925 रुपये असून TVS Radeo VSVI DIGI Drum Dual Tone ची किंमत 71966 रुपये आहे. तसेच Splendor + XTEC ची सुरुवातीची किंमत 73200 रुपये ठेवण्यात आली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.