सिंगल चार्जमध्ये 1200 किमी सूसाट, इलेक्ट्रिक कारची किंमत पण एकदम आवाक्यात

Electric Car | देशात इलेक्ट्रिक कारचे सेगमेंट आता व्यापक होत आहे. अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये जोरदार आघाडी आघाडी उघडली. त्यातच जगभरात पण अनेक प्रयोग सुरु आहे. आता या इलेक्ट्रिक कारने भारतीय ग्राहकांना नॅनोची आठवण करुन दिली आहे. नॅनोसारखीच छोटी पण स्वस्त इलेक्ट्रिक कारने बाजाराचे लक्ष आकर्षित केले आहे. कोणती आहे ही कंपनी...

सिंगल चार्जमध्ये 1200 किमी सूसाट, इलेक्ट्रिक कारची किंमत पण एकदम आवाक्यात
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 2:09 PM

नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कारचे सेगमेंट विस्तारत आहे. टाटा मोटर्सने यापूर्वी कॉम्पट कारचे स्वप्न भारतीयांना दाखवले. स्वस्त नॅनोचा प्रयोग रुजला नाही. पण टाटाने प्रयत्न सोडले नाही. लवकरच टाटा स्वस्तातील इलेक्ट्रिक कार भारतीयांसाठी बाजारात घेऊन येणार आहे. पण जगभरात पण त्यादृष्टीने प्रयोग सुरु आहेत. इलेक्ट्रिक कार ही येत्या काळात गरज ठरेल. चिनीच्या बाजारात पण तिथल्या कंपन्या कॅम्पॉट कारचे युग घेऊन येत आहेत. अनेक कंपन्यांनी या सेगेमेंटमधील गुंतवणूक कित्येक पटीने वाढवली आहे. चीनच्या फर्स्ट ऑटो वर्क्स (FAW) ने मायक्रो ईव्ही सेगमेंटवर लक्ष केंद्रीत केले आहे. या सेगमेंटमध्ये वाटा वाढवला आहे. बेस्ट्यून ब्रँडतंर्गत कंपनीने शाओमा(Xiaoma) ही लहान इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे.

किती आहे किंमत

याच महिन्यात या इलेक्ट्रिक कारची प्री-सेल्स सुरु होत आहे. FAW बेस्ट्यून शाओमाची थेट स्पर्धा वुलिंग होंगगुआंगच्या मिनी EV सोबत होत आहे. सध्या ही चीनमध्ये विक्री होणारी मायक्रो कार आहे. बेस्ट्यून शाओमाची किंमत 30,000 ते 50,000 युआन म्हणजे भारतीय चलनात जवळपास 3.47 ते 5.78 लाख रुपयांच्या दरम्यान असेल.

हे सुद्धा वाचा

दोन मॉडेल बाजारात

FAW बेस्ट्यून शाओमा यावर्षी एप्रिल महिन्यात शांघाय येथील ऑटो शोमध्ये चर्चेत आली होती. तिचे हार्डटॉर आणि कन्व्हर्टिबल असे दोन मॉडल आहेत. सध्या हार्डटॉप व्हेरिएंटची विक्री करण्यात येणार आहे. दुसरे मॉडल बाजारात कधी येईल, याविषयीची चर्चा समोर आलेली नाही. या कारला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट देण्यात आले आहे. त्याची स्क्रीन 7 इंचाची आहे. डॅशबोबर्ड पण आकर्षक आहे. या कारचे डिझाईन चीनी ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहे.

बेस्ट्यून शाओमा रेंज

बेस्ट्यून शाओमा FME प्लॅटफॉर्मवर आधारीत आहे. यामध्ये ईव्ही आणि रेंज एक्सटेंडर डेडिकेटेड चेसिस देण्यात आले आहे. या कारचा व्हीलबेस 2700-2850 एमएम आहे. तर दुसऱ्या मॉडेलचा व्हीलबेस 2700-3000 एमएम आहे. ईव्हीची रेंज 800 किमी तर एक्सटेंडरची रेंज 1200 किमींहून अधिक आहे. दोन्ही प्लॅटफॉर्म 800 V आर्किटेक्चरचा पाठिंबा मिळतो.

टाटा मोटर्सचा इलेक्ट्रिक ताफा

टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार बाजारात धडाक्यात सुरुवात केली आहे. नवीन ईव्ही कार बाजारात दाखल होतील. लूक, फीचर, रेंज आणि स्पीडमध्ये या कार जोरदार असतील. यामध्ये सर्वाधिक प्रतिक्षा पंच ईव्हीची आहे. पंच इलेक्ट्रिक कारची सुरुवात 10 लाख रुपयांपासून होण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.