दमदार फीचर्स आणि रेट्रो डिझाईनसह Yamaha ची शानदार बाईक भारतात लाँच, किंमत…

Yamaha Motor India ने शुक्रवारी आपली नवीन मोटरसायकल FZ-X भारतात लॉन्च केली आहे. या बाइकची किंमत 1.16 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे.

दमदार फीचर्स आणि रेट्रो डिझाईनसह Yamaha ची शानदार बाईक भारतात लाँच, किंमत...
भारतात यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक मोटरसायकल
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 5:54 PM

मुंबई : यामाहा मोटर इंडियाने (Yamaha Motor India) शुक्रवारी आपली नवीन मोटरसायकल FZ-X भारतात लॉन्च केली आहे. या बाइकची किंमत 1.16 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. बाईक दोन व्हेरिएंट्समध्ये बाजारात सादर करण्यात आली असून, याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 1.16 लाख रुपये इतकी आहे, तर टॉप एंड व्हेरिएंटमध्ये यमाहा मोटरसायकल कनेक्ट वैशिष्ट्य आहे, त्यामुळे या व्हेरिएंटची किंमत 1.19 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम दिल्ली येथील आहेत. (Yamaha FZ-X Launched In India; Prices Begin at Rs 1.17 Lakh)

वाहनाच्या आउटर लुकबद्दल बोलायचे झाल्यास, ही बाईक अगदी रेट्रो पद्धतीने डिझाइन केली गेली आहे, हा लूक तरुणांना खूप आवडेल. त्याच वेळी, या बाईकचं रियर डिझाइन आणि बॉडी पॅनेल एक अतिशय स्पोर्टी लूक सादर करते. बाईकच्या फ्रंटला लाँग सस्पेन्शन आहे जे रायडर सीट थोडीशी उंच ठेवतं. याशिवाय ही बाईक मॅट कॉपर, मेटॅलिक ब्लू आणि मॅट ब्लॅक कलर पर्यायांसह सादर करण्यात आली आहे.

FZ-X च्या लॉन्चिंगसह यामाहा कंपनी अजून एक प्रोडक्ट FZ सिरीजअंतर्गत लाँच करु शकतं. नवीन FZ-X मध्ये FZ-FI मोटारसायकलप्रमाणे इंजिन देण्यात आलं आहे. या बाईकच्या इंजिन पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 149cc एयर कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 7250 rpm वर 12.2 bhp पॉवर आणि 5500 rpm वर 13.6 Nm टॉर्क देऊ शकतं. यामध्ये तुम्हाला 5 स्पीड गियरबॉक्स मिळेल.

फीचर्स

या बाईकच्या महत्त्वाच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल मिळेल. यात तुम्हाला डिस्क ब्रेक, अ‍ॅलोय व्हील्स, सिंगल सेटअप सीट, एलईडी लाइट्स, अ‍ॅल्युमिनियम फीनिश्ड ब्रॅकेट्स, उंच सीट हँडलबार, यूएसबी चार्जर आणि बॉक्सी फ्यूल टँक मिळेल.

फुल्ली डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल स्मार्टफोन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह वापरता येईल. बाइक एकदा फोनशी कनेक्ट झाल्यानंतर रायडर यामाहा स्मार्टफोन अॅपचा वापर करुन व्हीकलचं बॅटरी स्टेटस आणि फ्यूल कंजम्प्शन तपासू शकतो. याचं कन्सोल तुम्हाला कॉल आणि एसएमएस अलर्टची माहिती देतं. यामाहाने म्हटलं आहे की, या बाईकमध्ये स्टँडर्ड फिटमेंट म्हणून एक मोबाईल चार्जरदेखील दिला आहे.

इतर बातम्या

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(Yamaha FZ-X Launched In India; Prices Begin at Rs 1.17 Lakh)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.