AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yamaha R15M नं अखेर कात टाकली, जाणून घ्या बदल आणि किंमत

Yamaha R15 M : जापानी कंपनीने बाइक लाईन अपमध्ये अपडेट केले आहेत. गाड्यांनी कात टाकली असून त्याचा लूकही आकर्षक दिसत आहे. नेमका काय बदल केला आणि किती किंमत आहे जाणून घेऊयात

Yamaha R15M नं अखेर कात टाकली, जाणून घ्या बदल आणि किंमत
Yamaha R15M जबरदस्त अपडेटसह लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 5:26 PM

मुंबई : जापानी यामाहा कंपनीच्या बाइकचे भारतात लाखो चाहते आहेत. भारतीय मार्केट पाहून कंपनीने आपली कंबर कसली आहे. असं असताना यामाहाने आपल्या सर्व बाइकच्या लाइन-अपमध्ये अपडेट केले आहेत. कंपनीने FZ-X, MT-15 आणि R15 या बाइकमध्ये अपडेट केले आहेत. कॉस्मेटिक अपग्रेडसह काही फीचर्सही अपडेट केले आहेत. त्यामुळे यामाहा बाइकच्या चाहत्यांना जबरदस्त राइड्सचा अनुभव घेता येणार आहे. यामाहा कंपनीच्या बाइकमध्ये R15M सर्वात टॉपला आहे. या बाइकमध्ये कंपनीने गरजेनुसार बरेच अपडेट केलेले आहेत. खरं तर जुना आणि नवा असा फरक केल्यास या बाइकनं कात टाकली असंच म्हणावं लागेल.कंपनीने लेटेस्ट बाइक ओबीडी-2 मानकं लक्षात ठेवून डिझाईन केलं आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या बाइक 2023 च्या शेवटापर्यंत 20 टक्के इथोनॉल मिश्रित पेट्रोल इंधनावर धावतील. म्हणजेच ई20 इंधनावर धावतील.

यामाहा R15M मध्ये काय आहे नवीन

यामाहा R15M OB2 इंजिनमध्ये कोणताही अतिरिक्त बदल करण्यात आलेला नाही. ही गाडी वॉल्व एक्चुएशन सिस्टमसह लिक्विड कूल्ड, 4 स्ट्रोक, एसओएचसी, 4 वॉल्व, 155सीसी फ्यूल इंजेक्टेड इंजिनसह येते. ही गाडी 10,000 आरपीएमवर 18.14 बीएचपी आणि 7500 आरपीएमवर 14.2 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही गाडी 6 स्पीड गियर बॉक्सशी जोडलेली आहे.

इतर बदलांचं बोलायचं तर, या गाडीत नवीन टीएफटी क्लस्टर आहे. मागच्या एलसीडी युनिटच्या तुलनेत अँडवास आहे. टीएफटी स्क्रिनमध्ये डे अँड नाईट मोड दिला आहे. टीएफटी युनिट्स ब्लूटूथला सपोर्ट करतो. त्यामुळे चालकाला एसएमएस आणि कॉल अलर्ट सिस्टम मिळेल. असं असलं तरी बाइक चालवताना टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सुविधा मिळत नाही.

बाइकच्या रंगरंगोटीत तसा काही बदल नाही. फक्त एक अतिरिक्त रंग लाँच केला आहे. बाइकमध्ये एलईडी टर्न इंडिकेटर्स आहेत. तसेच बाइक पूर्वीपेक्षा स्लीक आणि शार्प आहे. यापूर्वी यामाहामध्ये हॅलोजन टर्न इंडिकेटर मिळायचं. तसेच मोठे असल्याने त्याचा लूकही विचित्र दिसायचा. मात्र आता अपडेट केल्याने गाडीचा लूक आकर्षक वाटतो.

गाडीची किंमत काय आहे?

R15M ची किंमत 2500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या गाडीची किंमत 1,93,000 (एक्स शोरुम) इतकी झाली आहे. वाढीव किंमतीत नवी टीएफटी स्क्रिन आणि एलईडी टर्न इंडिकेटर्स मिळतात, असं म्हणायला हरकत नाही.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....