Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yamaha RX 100: बाईकची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 90 च्या दशकातील लोकप्रिय बाईक होणार रिलाँच

टेक्निकल अडचणींमुळे एकदम जुने जसेच्या तसे मॉडेल आणणे शक्य नसले तरी यामाहाकडून आरएक्स 100 च्या जुन्या ओळखीला आधुनिक स्टाइलमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आरएक्स 100 च्या नवीन मॉडेलला पॉवरफूल इंजिन आणि डिझाईनसह 2026 च्या जवळपास लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Yamaha RX 100: बाईकची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 90 च्या दशकातील लोकप्रिय बाईक होणार रिलाँच
Yamaha RX 100Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 1:11 PM

भारतात अनेक दुचाकींनी आपला काळ गाजवला आहे. राजदूत, यामाहाच्या दुचाकी त्यापैकीच एक आहेत. एक काळ होता, की या दुचाकी आपल्या दारासमोर लागणे म्हणजे स्टेटस सिंबॉल ठरत होता. रस्त्यांवर काही दुचाकींची तर अक्षरश: मक्तेदारीच होती असे म्हणावे लागेल. 1980 च्या दशकापासून भारतीय रस्त्यांवर दिसून येणारी लोकप्रिय बाइक यामाहा आरएक्स 100 लवकरच पुन्हा येण्याची चिन्हे आहेत. यामाहा मोटर इंडियाचे चेअरमन ईशिन चिहानाने (Eishin Chihana) एक न्यूज वेबसाइटशी बोलताना सांगितले, की कंपनी आरएक्स 100 चे (Yamaha RX 100) पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे. परंतु काही टेक्निकल अडचणींमुळे एकदम जुने जसेच्या तसे मॉडेल आणणे शक्य नसले तरी यामाहाकडून आरएक्स 100 च्या जुन्या ओळखीला आधुनिक स्टाइलमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आरएक्स 100 च्या नवीन मॉडेलला (New model) पॉवरफूल इंजिन आणि डिझाईनसह 2026 च्या जवळपास लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काय आहेत टेक्निकल अडचणी?

यामाहा आरएक्स 100 ची वापसी एकदम जुन्या मॉडेलसारखी नसणार आहे. याचे दोन टेक्निकल कारणे सांगण्यात येत आहेत. पहिले म्हणजे आरएक्स 100 दोन स्ट्रोक इंजिनसह उपलब्ध होते. तर दुसरे कारण म्हणजे टू-स्ट्रोक इंजिनसह कधीही बीएस 6 ला अनुकूल इंजिन तयार केले जाउ शकत नाही.

हे सुद्धा वाचा

2026 पर्यंत होणार लाँच

कंपनीचे चेअरमन ईशिन चिहाना यांनी सांगितले, की यामाहाजवळ 2025 पर्यंतची लाइनअपचे मॉडेल उपलब्ध आहेत. त्यामुळे आरएक्स 100 ला 2026 च्या आधी नव्या रुपात आणणे कठीण आहे. बिजनेस लाइनशी बोलताना चिहाना यांनी सांगितले, की कंपनीने आरएक्स 100 ला पुन्हा बाजारात आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे.

नवीन नावाचे दिले संकेत

ईशिन चिहाना यांच्या मते, कंपनी आरएक्स 100 च्या नावाचा वापर इतक्या सहज पध्दतीने करु शकत नाही. यामुळे आरएक्स 100 ची इमेजदेखील खराब होण्याचा धोका असल्याचे ते म्हणाले. आरएक्स 100 चे न्यू मॉडेल नवीन पध्दतीने तयार केले जाणार आहे. कंपनी आरएक्स 100 ला चांगल्या पद्धतीने लाँच करणार आहे.

नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले.