कारच्या काचा काळ्या करण्याबाबत माहिती असेल हा नियम तर टाळू शकता दंड
वाहनांमध्ये ठेवलेल्या मालाच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. टिंटेड काचेच्या वापरामुळे आतमध्ये ठेवलेला माल काही प्रमाणात चोरट्यांच्या नजरेपासून लपला जातो. आत बसलेल्या लोकांची प्रायव्हसीही पाळली जाते.

मुंबई : अनेकांना असे वाटते की त्यांनी त्यांच्या कारच्या काचा गडद केल्या (car tinted glass rule) तर त्यांचा रूतबा वाढेल. अशा लोकांना कारचे काळे काच फॅशन म्हणून दिसतात. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक मोठ्या प्रमाणात वाहनांच्या काचा काळे करायचे, पण आता गाड्यांच्या काचा काळ्या करणे हे बेकायदेशीर ठरत असल्याने ते कमी दिसत आहे. कारच्या आरशांवर शून्य दृश्यमानतेची काळी फिल्म लावणे गुन्हा आहे, हे वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. यासाठी वाहतूक पोलिस दंड करू शकतात.
पण, तरीही तुम्हाला कारची काच काळी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्याच्याशी संबंधित नियम नीट समजून घ्यावे लागतील. यासंबंधीच्या नियमांबद्दल जाणून घेऊया.
असा आहे नियम
कारच्या काचा पूर्णपणे काळे करता येत नाही, असा नियम आहे. तथापि, काचा काही प्रमाणात गडद केले जाऊ शकतात. मे 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने कारच्या टिंटेड काचेबाबत निर्णय दिला.




आदेशानुसार, कारच्या पुढील आणि मागील काचेची दृश्यमानता किमान 70 टक्के आणि बाजूच्या काचेची दृश्यमानता किमान 50 टक्के असावी. तसे न झाल्यास वाहतूक पोलिस दंड करू शकतात. म्हणूनच, जर तुमच्या कारच्या काचा काळ्या असतील तर हा नियम लक्षात ठेवा.
तुम्हाला कारच्या बाजूच्या खिडक्यांवर 50 टक्के दृश्यमानता ब्लॅक फिल्म आणि पुढच्या/मागील काचेवर 70 टक्के दृश्यमानता ब्लॅक फिल्म लावण्याची परवानगी आहे. अशी काळी फिल्म लावल्यास दंड होणार नाही, परंतु दृश्यमानता कमी असल्यास पोलिस दंड करू शकतात.
वाहनातील टिंटेड काच काही प्रमाणात बाहेरील उष्णता रोखते. जास्त उष्णता असल्यास एसीवरील भार वाढतो. इंधनाचीही बचत होते. जर तुम्ही फक्त उष्णतेपासून वाचण्यासाठी फिल्म लावत असाल, तर आजकाल उष्णतेपासून वाचण्यासाठी पारदर्शक फिल्मही बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे ब्लॅक फिल्मच्या तुलनेत उष्णतेपासून थोडा अधिक दिलासा मिळतो.
वाहनांमध्ये ठेवलेल्या मालाच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. टिंटेड काचेच्या वापरामुळे आतमध्ये ठेवलेला माल काही प्रमाणात चोरट्यांच्या नजरेपासून लपला जातो. आत बसलेल्या लोकांची प्रायव्हसीही पाळली जाते. हे ही तीतकेच खरे आहे.