Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या बांधकामाचे नवीन फोटो आले समोर, असं जोरात सुरु आहे बांधकाम
अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाचे नवीन फोटो समोर आले आहेत. मंदिराचं बांधकाम जोरात सुरु आहे.
अयोध्येत श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंदिराच्या बांधकामाच नवीन फोटो शेअर केले आहेत. ट्विटमध्ये फोटो शेअर करताना त्यांनी सांगितले की, श्री रामजन्मभूमी मंदिराच्या तळमजल्यावरील खांबांवर बीम लावण्याचे काम सुरू झाले आहे.
चंपत राय त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या श्री रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचे अपडेट्स शेअर करत असतात. श्री रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाचे फोटो आणि व्हिडीओ ते सर्वसामान्यांनाही पाहता येतात. राम मंदिराच्या बांधकामाची ताजे फोटो शेअर करताना चंपत राय यांनी लिहिले – ‘श्री जन्मभूमी मंदिराच्या तळमजल्यावरील खांबांवर बीम लावण्याचे काम सुरू झाले आहे.’
डिसेंबर 2023 पर्यंत रामाचे गर्भगृह तयार होईल आणि जानेवारी 2024 नंतर म्हणजेच मकर संक्रांतीनंतर गर्भगृह भक्तांसाठी खुले केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू राहणार आहे. राम दरबार व्यतिरिक्त माता अन्नपूर्णा, भगवान शंकर, बजरंगबलीसह अनेक मंदिरे येथे बांधली जाणार आहेत.
श्रीराम मंदिराचे ५० टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. चंपत राय यांच्या मते राम मंदिराचा पहिला टप्पा ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. प्राण प्रतिष्ठा 1 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान कधीही होऊ शकते. रामललाची मूर्ती 51 इंच असेल, जी गर्भगृहात बांधलेल्या व्यासपीठावर स्थापित केली जाईल.
रामनवमीच्या मुहूर्तावर चंपत राय यांनी ट्विटरवर निर्माणाधीन श्री रामजन्मभूमी मंदिराचा एक सुंदर व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओसह त्यांनी लिहिले- राम नवमीच्या शुभेच्छा. प्रभू श्रीरामाची असीम कृपा देशवासियांवर सदैव राहो. जय श्री राम. मंदिराच्या पायथ्याचे बांधकाम पूर्ण झाल्याचे चित्र आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल