रामभक्तांसाठी खुशखबर, आयोध्येत प्रत्यक्ष श्रीराम दर्शनाची तारीख जाहीर

कधी एकदा राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल आणि रामलल्लाचं दर्शन घेता येईल या प्रतीक्षेत देशभरातले रामभक्त आहेत.

रामभक्तांसाठी खुशखबर, आयोध्येत प्रत्यक्ष श्रीराम दर्शनाची तारीख जाहीर
आयोध्येतील राम मंदिराचं प्रतिकात्मच चित्र
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 5:23 PM

आयोध्या : संपूर्ण देशाचं लक्ष आयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाकडे आहे. कधी एकदा राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल आणि रामलल्लाचं दर्शन घेता येईल या प्रतीक्षेत देशभरातले रामभक्त आहेत. या सर्व रामभक्तांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आयोध्येतलं राम मंदिर भाविकांसाठी कधी खुलं केलं जाणार याची तारीख समोर आली आहे. (Date of Actual Shri Ram Darshan in Ayodhya Announced)


डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल

सध्या आयोध्येत मोठ्या वेगानं राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे. हे भव्य मंदिर 2023 पर्यंत बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत राम मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे डिसेंबर 2023 पासून जगभरातल्या रामभक्तांना आपल्या लाडक्या रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे.

प्रत्यक्षात पाहा राम मंदिराचं निर्माण

यासोबतच श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टने रामभक्तांसाठी आणखी खास सुविधा उलपब्ध केली जाणार आहे. राम मंदिराचं निर्माण ‘याची देही याची डोळा’ पाहता यावा यासाठी एक व्ह्यू पॉईंट उभारण्यात येणार आहे. जिथून राम मंदिराचं सर्व निर्माण रामभक्तांना पाहाता येईल. आयोध्येत येणारे सर्व भक्त मंदिर निर्माणाचं कार्य पाहू शकतील. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्रमार्फत संपूर्ण देशातून मंदिर निर्माणासाठी निधी संकलन सुरू आहे. राम मंदिर निर्माण समिति आपल्या कार्यात पूर्णपणे झोकून काम करत आहे.

मंदिर भूमिपूजनाची वर्षपूर्ती

गेल्यावर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं होतं. या भूमिपूजनाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्तानं आयोध्येत विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. ट्रस्टकडून कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

इतर बातम्या :
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.