-
Marathi News Board Result Registration For Result Marksheet 12th
Maharashtra Board 12th Result 2022
Maharashtra Board HSC Result 2022
Maharashtra Board HSC Result 2022 : जून महिना विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र 12वी निकाल 2022 बुधवार 8 जून 2022 ला जाहिर होणार असल्याचं महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून घोषित करण्यात आलं आहे.या निकालाची कमालीची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे. महाराष्ट्र 12 वीचा निकाल 2022 8 जून 2022 ला दुपारी 1 वाजता, तर 10 वीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लावणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. 12 वी प्रमाणे 10 वीचाही निकाल वेळेत लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. 12वीचा निकाल तुम्ही tv9marathi.com वर पाहू शकता याशिवाय बोर्डाचं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या www.mahahsscboard.in वरही निकाल पाहायला मिळेल. महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Mahrashtra Board HSC Result 2022) डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे….
Tv9 मराठीवर महाराष्ट्र 12वीचा निकाल! ही प्रोसेस फॉलो करा
- जेव्हा महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीच्या निकालाची घोषणा करेल, तेव्हा tv9 मराठीच्या tv9marathi.com वेबसाईटला भेट द्या
- होम पेज किंवा करिअर (टीव्ही9 मराठी करिअर) विभागात महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2022 च्या कोणत्याही बातमीवर क्लिक करा किंवा
- महाराष्ट्र बोर्ड 12वी निकालाच्या लिंकवर थेट होम पेजवर क्लिक करा
- आपला रोल नंबर आणि इतर माहिती भरा आणि सबमिट करा
- निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर उपलब्ध होईल
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल tv9marathi.com अधिकृत संकेतस्थळांव्यतिरिक्त इतर काही खासगी संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पाहायचा
- विद्यार्थ्यांनी प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in भेट द्यावी
- यानंतर होम पेजवर दिलेल्या “इयत्ता 12वी निकाल 2022” या लिंकवर क्लिक करा
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, इथे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा
- यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
- तुमच्या निकालाची प्रत छापून ती तुमच्याकडेच ठेवा
- रिझल्ट चेक करताना काय महत्त्वाच्या बाबी
- संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट नंबर वेगवेगळे आहेत हे लक्षात घ्या.
- सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी
- सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे
- आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येणार आहे
- महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल वेबसाईट