Budget 2021: निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट; महाराष्ट्रासाठी काय?; आदित्य ठाकरेंचा सवाल
केंद्रीय अर्थसंकल्पावरून शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. (aaditya thackeray slams On bjp over Union Budget 2021)
मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्पावरून शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्या राज्यांना अर्थसंकल्पात बरंच गिफ्ट मिळालंय. महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. (aaditya thackeray slams On bjp over Union Budget 2021)
आदित्य ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत त्यात काहीच नाही. तसेच काही राज्यात निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी अधिकच जास्त गिफ्ट देण्यात आलं आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, असा टोला आदित्य यांनी लगावला.
त्या पॅकेजचं काय झालं?
कोरोना काळात कोविडसाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्या पॅकेजचं काय झालं? असा सवाल करतानाच जे बजेट जाहीर झालं ते या राज्यांना कसं मिळणार? हे सरकारनं जाहीर करावं, असं आव्हान त्यांनी दिलं.
पर्यटानासाठी काहीच नाही
देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेईल असं वाटत होतं. पण बजेटमधून तसं काहीच दिसून आलं नाही. सर्वात जास्त रोजगार निर्मिती सध्या पर्यटन क्षेत्रात होऊ शकते. त्यामुळे पर्यटनावर भर देणं अपेक्षित होतं. पण बजेटमध्ये त्यावर काहीच तरतूद केलेली दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
हा तर निवडणूक जाहीरनामा: अमित देशमुख
निर्मला सितारामण यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प नसून आगामी काळात 5 राज्यात येऊ घातलेल्या निवडणूकींचा जाहिरनामा आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीही ठोस नसल्याने राज्याच्या पदरी निराशा आली आहे. थोडक्यात अर्थसंकल्पात महाराष्ट्र कोठेही दिसत नसून, महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे. खरे तर अर्थसंकल्पातून देशाच्या आगामी काळातील विकासाची दिशा निश्चित व्हावयास हवी. अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना काय दिले, गरीबांना काय दिले, विविध घटकातील विकासाच्या बाबतीत नेमके कोणते निर्णय घेतले, गेल्या वर्षभरातील लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. या अर्थव्यवस्थेला सावरुन घेण्यासाठी काय उपाय केले याबाबत या अर्थसंकल्पात काहीही दिसत नाही, असंही देशमुख यांनी म्हटलं आहे. (aaditya thackeray slams On bjp over Union Budget 2021)
महाराष्ट्र देशात आहे की नाही?: भुजबळ
कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी मोठ्या घोषणा होतील अशी अपेक्षा होती. मात्र केंद्रसरकारने कोणतीही मोठी घोषणा केली नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही न आल्यामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. भारताचा अर्थसंकल्प मांडताना यात महाराष्ट्र आहे की नाही असा सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केला. (aaditya thackeray slams On bjp over Union Budget 2021)
संबंधित बातम्या:
अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं; अजित पवारांची जहरी टीका
Union budget of India : देशाचं बजेट सादर, तुम्हाला काय मिळालं?
(aaditya thackeray slams On bjp over Union Budget 2021)