बजेटपूर्वी तुमच्या बजेटच्या ‘या’ 10 कार, सुरक्षेपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या
मारुती सुझुकीची नवी डिझायर जीएनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी कंपनीची पहिली सेडान आहे. कारमध्ये 1.2 लीटरचे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 82 पीएस पॉवर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करते.

भारतात कार खरेदी करणारे ग्राहक आता केवळ गाडीच्या लूक आणि फीचर्सकडे लक्ष देत नाहीत, तर त्याच्या सुरक्षिततेवरही भर देत आहेत. यामुळेच अनेक कार कंपनी आता सुरक्षेचे निकष लक्षात घेऊन आपली वाहने मजबूत करत आहेत. अलीकडच्या वर्षांत बऱ्याच कारने ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग प्राप्त केले आहे. हे त्यांना रस्त्यावरील सर्वात सुरक्षित कारमध्ये स्थान देते. विशेष म्हणजे यातील अनेक कार 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सुरक्षित कार खरेदी करण्याची संधी मिळते. 2025 मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या काही सर्वात स्वस्त कार चला तर मग पाहूया.
2025 मारुती सुझुकी डिझायर
मारुती सुझुकीची नवी डिझायर जीएनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी कंपनीची पहिली सेडान आहे. कारमध्ये 1.2 लीटर चे नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 82 पीएस पॉवर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करते. याचे सीएनजी व्हेरियंटही उपलब्ध आहे, जे 33 किमी/किलोचे मायलेज देते. ७ लाख रुपयांच्या बजेटमध्ये ही कार एक उत्तम पर्याय आहे.




टाटा पंच
टाटा पंच ही भारतातील सर्वात सुरक्षित बजेट एसयूव्ही पैकी एक आहे. 2021 मध्ये जीएनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे जे 88 पीएस पॉवर आणि 115 एनएम टॉर्क जनरेट करते. पंच ला 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह खरेदी केले जाऊ शकते. 7 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.
ह्युंदाई ग्रँड i10 निओस
भारतीय बाजारपेठेत 6 एअरबॅगसह येणारी ही सर्वात स्वस्त कार आहे. यात 1.2 लीटर कप्पा पेट्रोल इंजिन आहे, जे 83 पीएस पॉवर आणि 113.8 एनएम टॉर्क जनरेट करते. याची सुरुवातीची किंमत 5.92 लाख रुपये आहे.
ह्युंदाई एक्स्टर
मिनी एसयूव्ही सेगमेंटमध्ये येणारी ही सर्वोत्कृष्ट कार आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 6.12 लाख रुपये आहे. यात 6 एअरबॅग, एबीएस, ईबीडी, हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट देण्यात आले आहे.
ह्युंदाई ऑरा
सब-कॉम्पॅक्ट सेडानमध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी चा पर्याय देण्यात आला आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे, जे 82 बीएचपी पॉवर आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करते. याची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये आहे.
ह्युंदाई i20
i20 ही प्रीमियम हॅचबॅक कार असून त्याची सुरुवातीची किंमत 7.04 लाख रुपये आहे. यात 6 एअरबॅग, ईएससी, हिल असिस्ट कंट्रोल आणि 26 सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
स्कोडा कुशाक
स्कोडाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही उत्तम बिल्ड क्वालिटीसह येते. यात 6 एअरबॅग, ट्रॅक्शन कंट्रोल आणि सर्व प्रवाशांसाठी 3 पॉईंट सीट बेल्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याची सुरुवातीची किंमत 7.89 लाख रुपये आहे.
महिंद्रा एक्सयूवी 3xo
महिंद्राच्या नव्या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग, ईएससी, 16 इंच स्टील व्हील्स आणि इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबल मिरर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याची सुरुवातीची किंमत 7.49 लाख रुपये आहे.