Budget 2021: कोरोना काळात पाच मिनी बजेट एवढी आर्थिक मदत: निर्मला सीतारामन

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी बजेट मांडायला सुरुवात केली आहे. (Budget 2021-22: Aatmanirbhar packages were like 5 mini budgets, says FM)

Budget 2021: कोरोना काळात पाच मिनी बजेट एवढी आर्थिक मदत: निर्मला सीतारामन
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 11:35 AM

नवी दिल्ली: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी बजेट मांडायला सुरुवात केली आहे. बजेट मांडताना कोरोना काळात केंद्र सरकारने केलेल्या कामाचा सीतारामन यांनी आढावा घेतला. केंद्र सरकारने कोरोना काळात देशावासियांना घसघशीत आर्थिक मदत केली. ही आर्थिक मदत पाच मिनी बजेट एवढी होती, असं सीतारामन यांनी सांगितलं. (Budget 2021-22: Aatmanirbhar packages were like 5 mini budgets, says FM)

निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी देशवासियांना झुकून नमन केलं. त्यानंतर त्यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शेतकरी जिंदाबादच्या घोषणा संसदेत देण्यात आल्या. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून सीतारामन यांनी बजेट मांडण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने कोरोना काळात आत्मनिर्भर पॅकेज, अनेक योजना देशाच्या नागरिकांसाठी आणल्या. देशाची अर्थव्यवस्था पुढे नेण्याचाही त्यामागचा हेतू होता. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत 27.1 लाख कोटींची मदत करण्यात आली. ही मदत पाच मिनी बजेट एवढी होती, असं त्यांनी सांगितलं. कोरोना काळात 80 कोटी लोकांना धान्य देण्यात आलं. 8 कोटी जनतेला गॅस कनेक्शन देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना

यावेळी त्यांनी आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचीही घोषणा केली. सरकारकडून या योजनेसाठी 64180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्याच्या बजेटमध्ये वाढ करण्यासाठी ही तरतूद करणअयात आली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेचं स्थानिक आरोग्य मिशन भारतात लॉन्च करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. त्याचवेळी सीतारामन यांनी स्वच्छ भारत मिशन योजना पुढे नेण्याची घोषणाही केली. या योजनेअंतर्गत अमृत योजनेला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या योजनेसाठी 2,87,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय अर्थमंत्र्यांनी मिशन पोषण 2.0ची घोषणाही केली.

ग्लोबल इकॉनॉमी डळमळीत

यंदा डिजिटल बजेट सादर करण्यात येत आहे. देशाची जीडीपी दोनदा मायनस होत असताना आपण डिजिटल बजेट सादर करत आहोत. मात्र, जीडीपीमध्ये घट होण्याचा प्रकार केवळ भारतातच होत नसून ग्लोबल इकॉनॉमीमध्येही हाच प्रकार सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था कमजोर झालेली आहे. तरीही या कठिण प्रसंगातही आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं, विकासाचा वेग वाढवणं आणि सामान्य लोकांना मदत करण्यावर भर देणार आहोत, असं त्या म्हणाल्या. (Budget 2021-22: Aatmanirbhar packages were like 5 mini budgets, says FM)

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : प्रत्येक भारतीयाला माझे झुकून नमन : निर्मला सीतारमण

Union Budget 2021 highlights : बजेटमध्ये कुणाला काय? अर्थसंकल्प 2021 जसाच्या तसा

Nirmala Sitharaman Saree | निर्मला सीतारमण यांच्या लूकने लक्ष वेधले, लाल साडी निवडण्याचे कारण काय?

(Budget 2021-22: Aatmanirbhar packages were like 5 mini budgets, says FM)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.