Budget 2021: बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंपर घोषणा!

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा करण्यात आल्या आहेत. (Budget 2021-22: Sitharaman announces dedicated freight corridor)

Budget 2021: बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंपर घोषणा!
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 12:08 PM

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडूसह काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा करण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये इकनॉमिक कॉरिडोअर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या चारही राज्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच केंद्र सरकारने या घोषणा केल्याची चर्चा आहे. (Budget 2021-22: Sitharaman announces dedicated freight corridor)

निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यांच्यासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत. तामिळनाडूत 1.03 लाख कोटींचा नॅशनल हायवे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यातच इकॉनॉमिक कॉरिडोअर बनविण्यात येणार आहे. केरळमध्ये 65 हजार कोटी रुपयांचे नॅशनल हायवे निर्माण करण्यात येणार आहेत. यावेळी मुंबई-कन्याकुमारी इकनॉमिक कॉरिडोअरचीही घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता- सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आसाममध्ये येत्या तीन वर्षात हायवे आणि इकनॉमिक कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी यावेळी केली.

रेल्वे-मेट्रोसाठी मोठ्या घोषणा

यावेळी रेल्वे आणि मेट्रोसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय रेल्वे योजना 2030 तयार करण्यात आल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. रेल्वेसाठी 1.10 लाख कोटींचं बजेट करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मेट्रो लाइट आणण्यावरही भर देण्यात आला आहे. कोच्ची, बेंगळुरू, चेन्नई, नागपूर आणि नाशिक मेट्रो प्रकल्प तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

ऊर्जा क्षेत्रासाठी भरीव तरतूद

आजच्या अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्रासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी 3 लाख कोटी रुपये तरतूद असलेली योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे विजेशी संबंधित सर्व पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येणार आहेत. त्याशिवाय हायड्रोजन प्लांट निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. विद्यूत क्षेत्रात खासगी भागीदारीचं मॉडेलही स्वीकारलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (Budget 2021-22: Sitharaman announces dedicated freight corridor)

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : रस्त्यांसाठी 1 लाख 18, तर रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार कोटी

Budget 2021: कोरोना काळात पाच मिनी बजेट एवढी आर्थिक मदत: निर्मला सीतारामन

Union Budget 2021 highlights : बजेटमध्ये कुणाला काय? अर्थसंकल्प 2021 जसाच्या तसा

(Budget 2021-22: Sitharaman announces dedicated freight corridor)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.