Budget 2021: सीतारामण यांच्या भाषणात 48 वेळा ‘टॅक्स’ शब्दाचा उल्लेख; आणि मग….

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. (FM Nirmala Sitharaman announces tax reforms in Budget)

Budget 2021:  सीतारामण यांच्या भाषणात 48 वेळा 'टॅक्स' शब्दाचा उल्लेख; आणि मग....
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 4:29 PM

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. कोरोनानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थकसंकल्पाकडे संपूर्ण देशावासियांचं लक्ष लागलं होतं. या अर्थसंकल्पातून अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही गोष्टी महागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे. (FM Nirmala Sitharaman announces tax reforms in Budget)

निर्मला सीतारामण यांनी त्यांचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी बजेटचं भाषण अत्यंत छोटं केलं. 1 तास 48 मिनिटे त्यांनी भाषण केलं. त्यांनी 2019मध्ये 2 तास 15 मिनिटं भाषण केलं होतं. तर, 2020 मध्ये त्यांनी 2 तास 42 मिनिटं भाषण केलं होतं. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांनी यंदा अत्यंत छोटं भाषण केलं. गेल्या वर्षी त्यांच्या लांबलेल्या भाषणावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

टॅक्स 48 वेळा, इन्फ्रास्ट्रक्चर 29 वेळा

सीतारामण यांनी आजच्या पाऊण दोन तासांच्या भाषणात 48 वेळा टॅक्स, 29 वेळा इन्फ्रास्ट्रक्चर, 28 वेळा परिवहन, 25 वेळा आरोग्य, 21 वेळा अर्थव्यवस्था आणि 16 वेळा कोरोना शब्दाचा वापर केला. रोजगार, डिजिटल आणि युवा हे शब्द त्यांनी सर्वात कमी म्हणजे फक्त 7 वेळा वापरले आहेत. सीतारामण यांच्या भाषणात वारंवार टॅक्स हा शब्द येत असल्याने करदात्यांसाठी काही तरी मोठी घोषणा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. हा अर्थसंकल्प करदात्यांच्या अपेक्षेवर उतरणारा असेल अशीही चर्चा होती. मात्र, इतक्या वेळा टॅक्स शब्दाचा वापर करूनही सीरामण यांनी करदात्यांसाठी काहीच मोठी घोषणा केली नाही. त्यामुळे करदात्यांचा पुरता हिरमोड झाला.

विमा क्षेत्रात एफडीआय

या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विमा क्षेत्रात एफडीआयची गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विमा कायदा 1938मध्ये बदल करून एफआयडीआयची मर्यादा 49 वरून 74 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, बोर्डात भारतीय सदस्यच असतील अशी अट घालण्यात आली आहे.

गृह कर्जावर मिळणार फायदा

गृहकर्जाच्या व्याजावर सरकारने दीड लाख रुपयांची सूट वाढविलीय. यातून गृह कर्ज घेतल्यास गृहकर्जाच्या व्याजावर आपल्याला दीड लाखापर्यंतची कर सूट मिळणार आहे. जर आपण घर विकत घेतले तर मार्च 2022 पर्यंत तुम्ही घेतलेल्या कर्जावर आपल्याला ही सुविधा मिळेल. यामुळे गृह कर्ज घेणार्‍या लोकांना कराचा फायदा होणार आहे.

आयटीआर भरण्याची सोय

आता लोकांना आयटीआर भरण्यात फायदा होणार आहे. अर्थमंत्री म्हणाले, ‘करदात्यांच्या सोयीसाठी आयटीआर भरताना वेतन, उत्पन्न, कर भरणा, टीडीएस यासंबंधीची माहिती भरलेली असते. आता हे आणखी सोपे केले गेले आहे. यानंतर सिक्युरिटीजमधून मिळणारा भांडवली नफा, बँक-पोस्ट ऑफिसकडून मिळालेला लाभांश उत्पन्न आणि व्याज इत्यादीचा तपशीलदेखील प्रथम भरला जाईल. अशा परिस्थितीत लोक सहजपणे कर भरण्यास सक्षम होतील. (FM Nirmala Sitharaman announces tax reforms in Budget)

‘या’ लोकांना फायदा होणार

आतापर्यंत छोट्या शाळा आणि रुग्णालये चालविणार्‍या लोकांना 1 कोटींपर्यंत उलाढालीची सूट मिळाली आहे. आता ती 5 कोटींवर वाढविण्यात आलीय. अशा परिस्थितीत लोकांना त्याचा फायदा घेता येईल. (FM Nirmala Sitharaman announces tax reforms in Budget)

संबंधित बातम्या:

Budget 2021-22 : तुमच्याकडेही 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे? Scrappage Policy चा परिणाम काय?

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Budget 2021: देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना, पण नेमकी कशी होणार?; वाचा सविस्तर!

(FM Nirmala Sitharaman announces tax reforms in Budget)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.