AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा

Budget 2021-22 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला.

Budget 2021 : आता स्मार्टफोन्स महागणार! मोबाईल पार्ट्सबाबत सरकारची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 4:00 PM

Budget 2021-22 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सोने-चांदीवरील सीमाशुल्कात कपात करण्याच्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर भारतीय बनावटीचे मोबाईलही स्वस्त होणार आहेत. सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी होणार असल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात कपात होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याशिवाय भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त होणार आहेत. तर परदेशी बनावटीचे मोबाईल, चार्जर महागणार आहेत. (Budget 2021 : from 1 october custom duty new structure will come, mobile parts will also be included in custom duty)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, मोबाईल पार्ट्सवर आता कस्टम ड्युटी लागेल. त्यामुळे भारतात मोबाईल्सच्या किंमती वाढणार आहेत. कस्टम ड्युटी धोरणासंदर्भात असे म्हटलेय की, यामुळे देशांतर्गत मोबईल उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. मोबाइल डिव्हाईसवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्क्यांपर्यंत वाढली असताना सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. स्टील उपकरणांवर कस्टम ड्युटी 7.5 टक्के करण्यात आली आहे. तर तांबे आणि नायलॉनवरील कस्टम ड्युटी 2.5 ते 5 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. दरम्यान आता कस्टम ड्युटी पेपरलेस करण्याची तयारी सुरू आहे.

…म्हणून मोबाईल पार्ट्सवर कस्टम ड्युटी 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की आता मोबाईल्सच्या भागांवरही कस्टम ड्युटी लागू केली जाईल. त्यामुळे भारतात बनवलेले स्मार्टफोन आता कस्टम ड्युटी लावल्यानंतर अजून महाग होतील. सरकारने सांगितले की, देशांतर्गत उत्पादनाला (डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग) चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. भारतात अशा अनेक स्मार्टफोन कंपन्या आहेत ज्या परदेशातून मोबाईल पार्ट्सची आयात करतात. अशा परिस्थितीत आता या पार्ट्सवर आयात कर लावल्यामुळे मोबाईल्सच्या किंमती वाढतील, परिणामी मोबाईल कंपन्या हे पार्ट्स परदेशातून मागवण्याऐवजी भारतातच विकसित करतील, त्यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल.

सध्या किती कस्टम ड्युटी लावली जाते?

सध्या बॅटरी चार्जवर 15 चे 20 टक्के कस्टम ड्युटी लावली जाते तर हँडसेटवर 22.5 टक्के कस्टम ड्युटी लावली जाते. डिस्प्ले पॅनल, PCB, मॅकेनिक्स आणि डाय कट पार्ट्सवर 10 टक्के ड्युटी लावली जाते. मोबाईल्सच्या सर्व पार्ट्सवर मिळून एकूण 50 टक्क्यांपर्यंतची कस्टम ड्युटी लावली जाते. भारतात मोबाईल फोन्स आणि अॅक्सेसरीज जीएसटीअंतर्गत येतात. सध्या मोबाईल फोन्सवर (फिचर फोन असो अथवा स्मार्टफोन) 12 टक्के जीएसटी लावला जातो. तर इलेक्ट्रॉनिक मोबाईल अॅक्सेसरीजवर 18 टक्के जीएसटी लावला जातो.

काय स्वस्त?

सोने-चांदी

भारतीय बनावटीचे मोबाईल

चप्पल

नायलॉन – कस्टम ड्युटी कमी करुन 5 टक्क्यांवर

टेक्सटाईल्स – कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार

स्टील – कस्टम ड्युटी कमी करुन 7.5 टक्क्यांवर

केमिकल- केमिकलवरील कस्टम ड्युटी कमी करणार

चामड्याच्या वस्तू, गारमेंट – कस्टम ड्युटी कमी करणार

काय महाग?

अपारंपरिक ऊर्जा – सोलार पॅनल- इन्व्हर्टर – 5 वरुन 20 टक्क्यांवर

मोबाईल ऑटो पार्ट – काही गोष्टींवर कस्टम ड्युटी वाढवली

परदेशी मोबाईल आणि चार्जर

तांब्याचे सामान

जेम्स स्टोन – कस्टम ड्युटी वाढवली

इथाईल अल्कोहोल –

(Budget 2021-22 What gets costlier and what gets cheaper in Marathi)

ज्येष्ठ नागरिकांना करातून दिलासा

2020 मध्ये एकूण 6.48 नागरिकांनी आयकर भरला. 75 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे ज्येष्ठ नागरिक, जे पूर्णतः पेन्शनवर अवलंबून आहेत, त्यांना इन्कम टॅक्समधून दिलासा मिळाला आहे. पेन्शन आणि व्याजाच्या माध्यमातून आलेल्या मिळकतीवर ज्येष्ठ नागरिकांना कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

हेही वाचा

Budget 2021: सोने-चांदी, चप्पल स्वस्त होणार; मोबाईल, चार्जर, विदेशी कपडे, इलेक्ट्रिक वस्तू महागणार

Budget 2021-22 : सोने-चांदीचे दर घटणार, मोबाईल पार्ट्स महागणार, काय स्वस्त काय महाग?

Budget 2021 : भारत 5 वर्षात ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल; गडकरींकडून वाहन स्क्रॅप धोरणाचं कौतुक

(Budget 2021 : from 1 october custom duty new structure will come, mobile parts will also be included in custom duty)

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....