Budget 2021: देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना, पण नेमकी कशी होणार?; वाचा सविस्तर!
देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार आहे. (Budget 2021: Rs 3,726 crore allocated for forthcoming Census, says FM)
नवी दिल्ली: देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 3,726 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षी देशाची जनगणना होणार असून पहिल्यांदाच डिजिटल स्वरुपात देशावासियांचं सर्व रेकॉर्ड संरक्षित करण्यात येणार आहे. (Budget 2021: Rs 3,726 crore allocated for forthcoming Census, says FM)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. तसेच डिजिटल जनगणनेसाठी 3,726 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोबाईल फोन अॅप्लिकेशनद्वारे जनगणना करण्याची मागणी केली होती. मोबाईल फोन अॅप्लिकेशनद्वारे जनगणना केल्यास आपण डिजिटल जनगणनेच्या दिशेने वाटचाल करू, असं शहा म्हणाले होते.
अशी होणार जनगणना
डिजिटल जनगणनेसाठी केंद्र सरकार 16 भाषांमध्ये अॅप तयार करणार आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. त्यानंतर त्यात तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची माहिती भरावी लागणार आहे. त्यांचे वय आणि लिंग याची माहिती भरावी लागणार आहे. त्याशिवाय या अॅपमध्ये आणखी काय काय माहिती भरायची याबाबतच्या सूचना भारत सरकारकडून जारी करण्यात येईल. त्यानुसार प्रत्येकाला घरी बसूनच आपली नावं नोंदवता येणार आहेत.
16 भाषेत अॅप तयार करणार
शहा यांनी डिजिटल जनगणनेसाठी मोबाईल अॅप विकसित करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे जनतेला त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती स्वत: भरता येईल. 12,000 कोटी रुपये खर्च करून 16 भाषेत हे अॅप तयार केलं जाणार असल्याचं शहा यांनी सांगितलं होतं.
देशाची लोकसंख्या किती
2011मध्ये झालेल्या जनगणनेनुसार देशाची एकूण लोकसंख्या 121 कोटी आहे. केंद्र सरकारने मार्च 2020मध्ये घोषणा करून मार्च 2021मध्ये जनगणना करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. केंद्रीय गृहमंत्रालयाने जनगणनेसाठी एक नोटीफिकेशन जारीही केलं होतं. संविधानाच्या अनुच्छेद 3 अंतर्गत जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं.
जातीय जनगणना व्हावी
दरम्यान, केंद्र सरकारने जनगणना करण्याची घोषणा करताच जातीय जनगणना करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. जातीय जनगणना करून प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे हे निर्धारित करावं, अशी मागणी करण्यात येत आहे. अलिकडेच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करून ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी केली होती. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. या देशातच राहतो, आमचीही जनगणना करा, असं सांगतानाच पंकजा यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं संसदेतील एक भाषणही ट्विट केलं होतं. (Budget 2021: Rs 3,726 crore allocated for forthcoming Census, says FM)
Budget 2021-22 LIVE Streaming : कृषी, आरोग्य, शिक्षणासाठी काय तरतूद?, सामान्यांना कोणता दिलासा?, अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्षhttps://t.co/Q9iYWqA38l#NirmalaSitharaman | #Budget2021 | #BudgetSession
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 1, 2021
संबंधित बातम्या:
Budget 2021: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LIC चे खासगीकरण, लवकरच IPO बाजारात येणार
Petrol & Diesel: पेट्रोलची शंभरी निश्चित, डिझेलही भडकणार, अर्थमंत्र्यांची सेसची मोठी घोषणा
(Budget 2021: Rs 3,726 crore allocated for forthcoming Census, says FM)