Budget 2022 : आता सर्व आरोग्य सुविधा एकाच प्लेटफॉर्मवर, अर्थमंत्र्यांकडून नव्या पोर्टलची घोषणा!

अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प आहे. कोरोना (Corona) व्हायरसच्या काळात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

Budget 2022 : आता सर्व आरोग्य सुविधा एकाच प्लेटफॉर्मवर, अर्थमंत्र्यांकडून नव्या पोर्टलची घोषणा!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 2:56 PM

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प आहे. कोरोना (Corona) व्हायरसच्या काळात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री सीतारमन यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितले की, नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू केले जाईल. यामध्ये आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांसाठी डिजिटल नोंदणीचा ​​समावेश असेल.

-आरोग्य सुविधा एकाच प्लेटफॉर्मवर उपलब्ध

नागरिकांची सुविधा वाढवण्यासाठी 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट जारी केले जाईल, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) मार्च 2023 पर्यंत वाढवली जाईल असेही सांगितले. हमी कवच ​​50,000 कोटी रुपयांवरून एकूण 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​जाईल, असे ही सीतारमन यांनी सांगितले.

-आपत्कालीन विम्या अंतर्गत 5 लाखांची मदत

आपत्कालीन विम्या अंतर्गत 5 लाखांची मदत आता मिळणार आहे. कोरोनामुळे देशात आरोग्य विम्याबाबत मोठ्या प्रमाणात सजगता निर्माण झाली आहे. लाखो कोरोना बाधित नागरिकांच्या आप्तजणांनी आरोग्य विमा खरेदी करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. सध्या विविध कंपन्यांनी आरोग्य विमे उपलब्ध केले आहेत. व्यक्ती, वय तसेच आरोग्य गरजा यानुरुप प्रत्येक विम्याच्या हफ्त्यात भिन्नता आहे. मात्र, आरोग्य विम्यावर असलेल्या 18% जीएसटीमुळे विम्याच्या प्रीमियममध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Budget 2022: यंदाच्या अर्थसंकल्पात 25 वर्षाची ब्ल्यूप्रिंट, जीडीपी 9.2% टक्के राहणार; निर्मला सीतारामण यांचे बजेट भाषण सुरू

Budget 2022: ‘झिरो बजेट’ शेतीची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, काय आहे तरतूद?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.