Budget 2022 | मोदी सरकारचा टॅक्स स्लॅबचाही रेकॉर्ड, तुमचा इनकम टॅक्स कसा कटणार ?
नवी दिल्लीः मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील (Budget 2022) महत्त्वाचा मुद्दा हा आयकर सवलतींचा असतो. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetharaman) नोकरदारांसाठी कोणती घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आयकर किंवा प्राप्तिकराच्या सवलतीत काही दिलासा मिळेल का, याकडे आशा लावून बसलेल्या नोकरदारांची बजेटकडून निराशा झाली आहे. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये (Income Tax Slabs) […]
नवी दिल्लीः मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दृष्टीने अर्थसंकल्पातील (Budget 2022) महत्त्वाचा मुद्दा हा आयकर सवलतींचा असतो. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetharaman) नोकरदारांसाठी कोणती घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आयकर किंवा प्राप्तिकराच्या सवलतीत काही दिलासा मिळेल का, याकडे आशा लावून बसलेल्या नोकरदारांची बजेटकडून निराशा झाली आहे. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये (Income Tax Slabs) कोणताही बदल झालेला नाही. 2022-23 या आर्थिक वर्षातदेखील जुनीच कररचना सुरु राहणार. मात्र कर चोरी पकडल्यास सदर व्यक्तीची संपत्ती जप्त होऊ शकते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. देशातील एक मोठा पगारदार वर्ग करदाता असतो. ज्याचे वर्षाचे उत्पन्न निश्चित असते. अशा व्यक्तींना अर्थसंकल्पात आयकरातून सूट मिळते का, असा प्रश्न पडलेला असतो. मागील काही वर्षांपासून आयकरात कोणतीही अतिरिक्त सवलत मिळालेली नाही. यंदादेखील आता टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दिव्यांग व्यक्तींच्या पालकांना मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात सवलत देण्यात आली आहे.
कर भरण्याच्या प्रक्रियेत काय सुधारणा?
कर भरण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी करदात्यांना संधी दिली जाणार आहे. ही मोठी घोषणा आजच्या बजेटमध्ये करण्यात आली. या प्रक्रियेत पुढील सवलती देण्यात आल्या आहेत.
– अपडेटेड रिटर्न पुढील 2 वर्षात फाइल करता येतात. मात्र त्यासाठी दंडही भरावा लागेल. – आयकर रिटर्नमध्ये नंतर कोणतीही सुधारणा करता येऊ शकते. – भारतातील करदात्यांना याचा फायदा होईल. तसेच आयकरासंबंधी वादांमध्ये याची मोठी मदत होईल.
आर्थिक वर्ष 2022-23 साठी नवी कररचना पुढीलप्रमाणे-
– 0 ते 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले नोकरदार करमुक्त असतील. – 2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 5 टक्के आयकर लागेल. – 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 10 टक्के आयकर लागेल. – 7.5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 15 टक्के आयकर असेल. – 10 ते 12.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 20 टक्के आयकर लागेल. – 12.5 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 25 टक्के आयकर लागेल. – 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 30 टक्के आयकर लागेल.
I propose to provide that any income from transfer of any virtual digital asset shall be taxed at the rate of 30%. No deduction in respect of any expenditure or allowance shall be allowed while computing such income, except cost of acquisition: FM Nirmala Sitharaman#Budget2022 pic.twitter.com/DHQvZsRyeN
— ANI (@ANI) February 1, 2022
इतर बातम्या-