Budget 2022: देशात डिजिटल युनिव्हर्सिटी होणार, शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात आणखी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा? 

Budget 2022 Education Sector: डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी डिजिटल युनिव्हर्सिटीची स्थापना केली जाईल, याचा उद्देश विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा असेल.

Budget 2022: देशात डिजिटल युनिव्हर्सिटी होणार, शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात आणखी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा? 
Nirmala Sitharaman Budget 2022
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 4:35 PM

Budget 2022 Education Sector: प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला गेला जात आहे. प्रत्येक सामान्य व्यक्तीला या अर्थसंकल्पाबाबत ज खूपच आशा अपेक्षा असतात. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये देश असताना येणारे व सादर केले जाणारे अर्थसंकल्प खूपच महत्वपूर्ण ठरत आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्तरावरील व्यक्ती व वेगवेळ्या उद्योग स्तरावर असलेले उद्योग पती या सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पावर लागलेल्या आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा या अर्थसंकल्पाकडून खूपच अशा अपेक्षा आहेत. सादर केले गेलेले अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्राला (Education Sector) खूप काही वाट्याला येणे गरजेचे आहे. कारण की कोरोना च्या काळामध्ये जर कोणते क्षेत्र जास्त प्रभावित झाले असेल तर ते क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. या क्षेत्रावर या कोरोना महामारी (Corona) ने खूपच बिकट परिस्थिती निर्माण केलेले आहे आणि यांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर झालेला पाहायला मिळतोय. अशातच सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये शैक्षणिक क्षेत्राला नेमके काय काय सुविधा मिळणार आहेत तसेच कोणकोणत्या प्रकारच्या तरतुदीच्या घोषणा केल्या जाणार आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कसे असेल डिजिटल विद्यापीठ?

डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल युनिव्हर्सिटीची (Digital University) स्थापना केली जाईल. याचे एकमेव उद्दिष्ट विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे हा असेल. या डिजिटल युनिव्हर्सिटी मध्ये अनेक भाषांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल त्याच बरोबर या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी “वन क्लास वन टीव्ही चॅनल(one class one tv channel) प्रोग्राम सुद्धा सुरू केला जाईल.इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत वर्गासाठी राज्य आपल्या क्षेत्रीय भाषांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण पुरवेल त्याचप्रमाणे शिक्षणाच्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून देईल. वन क्लास टीव्ही चॅनल प्रोग्राम ला 200 चॅनेल पर्यंत एक्सपांड केले जाईल म्हणजेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापुर्णक शिक्षणासाठी 200 चॅनल पर्यंत चे नवीन निर्मिती विस्तारिकरण करण्यात येईल.

शिक्षकांना दिले जाईल प्रशिक्षण

भविष्यात स्कीलिंग प्रोग्रामला म्हणजेच कौशल्य कार्यक्रम ला नवीन स्वरूप दिले जाईल.आपला भारत देश हा तरुणांचा देश आहे आणि म्हणूनच तरुणांसाठी वेगवेगळे स्किलिंग, अपस्किलिंग आणि रीस्किलिंगसाठी डिजिटल देश ई-पोर्टल लॉन्च केले जाईल. गुणवत्ता पूर्ण आणि माहिती युक्त आवश्यक असलेला ई कंटेंट अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार केला जाईल त्याचबरोबर हा कंटेंट प्रश्नआपल्यासमोर वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा सादर करण्यात येईल. चांगल्या दर्जाचे शिक्षण परिणाम जर आपल्याला प्राप्त करायचे असतील तर त्यासाठी शिक्षकांना सुद्धा योग्य प्रशिक्षणाची गरज भासेल आणि म्हणूनच अशा वेळी शिक्षकांना आवश्यक ती प्रशिक्षण सुविधा सुद्धा पुरवली जाईल. शहरी नियोजन करण्यासाठी पाठ्यक्रम व प्रशिक्षण अनुषंगाने भविष्यात 5 शैक्षणिक संस्थांचा विकास केला जाईल.

इतर बातम्या-

औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाला जप्तीची नोटीस, दीड कोटींचा करमणूक कर थकवला

Onion: बाजार समितीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका, कांदा उत्पादक संघटनेच्या पत्रात दडलंय काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.