Budget 2022 – कधी पटलावर येणार अर्थसंकल्प… तारीख, वेळ आणि कुठे पाहता येणार अर्थसंकल्प…जाणून घ्या एका क्लिकवर
कोरोना संकटात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे. 1 फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प पटलावर येणार आहे. यंदाचा हा अर्थसंकल्प पूर्णपणे डिजिटल असणार आहे. अर्थसंकल्पाच्या मोजक्याच प्रती छापण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला (1 February ) सादर करणार आहेत. मोदी सरकारचं हे चौथं अर्थसंकल्प आहे. आणि कोरोना काळातील दुसरं अर्थसंकल्प आहे. त्यामुळे यंदाही आरोग्य क्षेत्रासाठी अधिक तरतूद करण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदाचं अर्थसंकल्प (Budget 2022) पूर्णपणे डिजिटल असणार आहे. हरितक्रांतीला चालना देण्यासाठी यंदा हरित अर्थसंकल्पाची कल्पना राबवली जाणार आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांचा पोटलीतून काय निघणार असं बोलण्याऐवजी त्यांचा टॅबमधून कुठल्या क्षेत्रासाठी काय तरतूद असणार आहे हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे कधी मांडला जाणार अर्थसंकल्प आणि किती वाजता या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.
Budget 2022 – अर्थसंकल्पीय अधिवेशन
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरु झालं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागात असणार आहे. पहिला भाग हा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर दुसरा भाग 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान असणार आहे.
Budget 2022 – तारीख आणि वेळ
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. 2020मध्ये सीतारामन यांनी सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण होतं. अर्थसंकल्प सीतारामन यांनी जवळपास 160 मिनिटं भाषण दिलं होतं. यंदा अर्थसंकल्पीय भाषण अंदाजित 1.30 तास ते 2 तासांदरम्यान असू शकते.
कुठे पाहता येईल अर्थसंकल्प?
यंदाही हे अर्थसंकल्प लोकसभा टीव्हीवर थेट दाखविण्यात येणार आहे. तसंच या अर्थसंकल्पनेचं थेट प्रक्षेपण तुम्ही टीव्ही9 मराठी या चॅनेलवर आणि टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटवर पाहू शकता. तसंच इतर विविध न्यूज आउटलेट, YouTube आणि Twitter या सोशल मीडियावरही तुम्ही पाहू शकतात.
अर्थसंकल्पनेचा इतिहास
26 नोव्हेंबर 1947 साली देशाचा पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. शणमुखम यांनी पहिला अर्थसंकल्प पटलावर मांडला होता. तसंच तर अर्थसंकल्प हा देशाचा अर्थमंत्री मांडत असतो. मात्र पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी अर्थसंकल्प मांडला होता. तसंच या अर्थसंकल्पाची एक वेगळी खासियत पण आहे. ती म्हणजे अर्थसंकल्पाची प्रत छापण्यासाठी जेव्हा जाते तेव्हा अर्थमंत्रालयासाठी खास हलवा बनविला जातो. त्याला बजेट हलवा समारंभ असं म्हणतात. तर सर्वाधिक अर्थसंकल्प अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी पटलावर मांडले. त्यांनी 10 अर्थसंकल्प सादर केली. तर दुसऱ्या क्रमांकावर 8 वेळा अर्थसंकल्प पी चिदंबरम यांनी सादर केला. तर 2017मध्ये पहिल्यांदाच आर्थिक आणि रेल्वे बजेट एकत्र मांडण्यात आलं.